तुकाराम मुंढे यांची बदली करू नका:चांदूर बाजार काँग्रेसची तीन वर्षांसाठी मागणी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुढील तीन वर्षे बदली करू नये, अशी मागणी चांदूर बाजार तालुका ग्रामीण काँग्रेसने केली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात गुटखा माफिया, भेसळखोर आणि बनावट औषधी रॅकेटविरोधात धडक कारवाया केल्या आहेत. दूध, पनीर, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवरही त्यांनी…