मोर्शीत वादळी पाऊस, गारपीटमुळे संत्रा झाडे भुईसपाट:आंबिया बहर गमावला; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रविवारी सायंकाळी मोर्शी शहर आणि तालुक्यातील पाळा, भाईपूर, मायवाडी या शेत शिवारात अचानक आलेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, आंबिया बहर पूर्णपणे नष्ट झाला आहे. मोर्शी महसूल मंडळातील मोर्शी, भाईपूर, मायवाडी आणि पाळा येथील काही संत्रा झाडे मुळासकट उन्मळून पडली. झाडांवर लागलेली…