Headlines

दीपक परतेती यांची पीएसआयपदी निवड:आदिवासी समाजातील पहिले युवक, जामगाव महेंद्री गावात जंगी स्वागत




वरुड तालुक्यातील जामगाव महेंद्री येथील आदिवासी समाजातील तरुण दीपक विश्वेश्वर परतेती यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी निवड झाली आहे. आदिवासी समाजातून या पदावर पोहोचणारे ते पहिलेच युवक ठरले आहेत, ज्यामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. दीपक परतेती यांच्या यशाबद्दल महेंद्री ऍग्रो टुरिझमचे संचालक विजय श्रीराव आणि पहाट पक्षी मित्र मंडळातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वरुडचे आमदार उमेश यावलकर यांच्या हस्ते नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक दीपक परतेती आणि त्यांच्या पत्नी प्रियंका परतेती यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नितीन खेरडे होते. राजेंद्र केदार, बाळू मुरूमकर, बबलू पावडे, राजश्री श्रीराव यांच्यासह तालुक्यातील अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्रा. कमलनारायन उईके यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. सत्कार सोहळ्यानंतर जामगाव महेंद्री गावात दीपक परतेती यांची मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात गावकऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आपल्या गावातील मुलाच्या या यशाने संपूर्ण गाव अभिमानाने भारावून गेले होते. या सत्कार सोहळ्याबद्दल बोलताना पीएसआय दीपक परतेती म्हणाले की, ‘हा सोहळा माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. माझ्या हक्काच्या स्वगृहात (गावात) माझे कौतुक करण्यासाठी तालुक्यातील एवढी मोठी मान्यवर मंडळी उपस्थित राहिली, याचा मला खूप अभिमान आहे. या सर्वांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही.’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *