अमरावती विधान परिषद निवडणूक: एकाची माघार, तिघे रिंगणात:महायुती विरुद्ध मविआ असाच होणार संघर्ष
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, गुरुवारी (४ जून), अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे या निवडणुकीत आता केवळ तीन उमेदवार रिंगणात उरले आहेत. या तीन उमेदवारांमध्ये महायुतीचे भाजपचे प्रवीण पोटे, महाविकास आघाडीचे (मविआ) काँग्रेसचे हर्षजीत देशमुख आणि वंचित…