शासनाने गणवेश निधीत 20 टक्के कपात केली:महागाईत 300 वरून 240 रुपये; 1 लाख विद्यार्थ्यांना फटका, शिक्षक अंमलबजावणीस नकार
आगामी शैक्षणिक वर्षासाठी (२०२६-२७) मोफत शालेय गणवेशाच्या निधीत शासनाने थेट २० टक्क्यांची कपात केली आहे. प्रति गणवेश ३०० रुपये देण्याचा प्रघात असताना, यंदा शाळांच्या खात्यात केवळ २४० रुपयेच जमा करण्यात आले आहेत. वाढत्या महागाईत ३०० रुपयांतही पुरेसे कापड मिळत नसताना, २४० रुपयांत विद्यार्थ्यांना गणवेश कसा पुरवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शिक्षक-पालकांनी चिंता व्यक्त…