डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचा पुनर्मूल्यांकन निकाल प्रलंबित:निकाल तात्काळ जाहीर करा, भाजप विद्यार्थी आघाडीची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संगणक अभियांत्रिकी विभागाच्या हिवाळी 2025 परीक्षेचा पुनर्मूल्यांकन निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यापीठाकडून पुनर्परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, पुनर्मूल्यांकनाचा निकाल प्रलंबित असल्याने अनेक विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेचा अर्ज भरावा की नाही,…