Headlines

Admin

Delhi Restaurant Fire Photos; Malviya Nagar Basement Tragedy

Marathi News National Delhi Restaurant Fire Photos; Malviya Nagar Basement Tragedy | DFS Rescue Operation नवी दिल्ली26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक दिल्लीतील मालवीय नगर येथील फ्लरिश स्टे हॉटेलमध्ये बुधवारी आग लागल्याने २१ लोकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, आग खाली तळघरात असलेल्या रेस्तरॉंमध्ये लागली होती. आगीने संपूर्ण इमारतीला वेढले होते. अनेक लोकांनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडकीतून उड्या…

Read More

राम चरणला भेटून चाहता रडला:स्टेजवर अभिनेत्याकडे धावला होता, जान्हवी कपूर घाबरली; बॉडीगार्डने उचलून बाहेर काढले

चित्रपट ‘पेद्दी’ च्या प्रमोशन इव्हेंटचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात राम चरणसारखा दिसणारा एक चाहता सुरक्षा घेरा तोडून स्टेजकडे धावला होता. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ थांबवले होते. या घटनेनंतर, राम चरणने त्या चाहत्याची स्वतंत्रपणे भेट घेतली. ही भेट पूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या घटनेनंतर तो चाहता खूप भावूक झाला होता…

Read More

सायकलस्वारांचा ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीचा संकल्प:रॅलीला मोठा प्रतिसाद, जिल्हा सायकल संघटनेचा पुढाकार

सायकल चालवा, आरोग्य घडवा’, पर्यावरण वाचवा आरोग्य जपा, आपली हिंगोली ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीच्या घोषणादेत हिंगोलीत शेकडो सायकलस्वारांनी बुधवारी ता. ३ काढलेल्या सायकल रॅलीत ग्रीन हिंगोली हेल्दी हिंगोलीचा संकल्प केला. यावेळी शेकडो सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला होता. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभुमीवर सद्‌भाव सेवाभावी संस्था, जिल्हा सायकल संघटना, आशा सायकल यांच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते….

Read More

5 हजार भारतीय रेस्तरॉं बंद होण्याच्या मार्गावर:जपानमध्ये भांडवलाची अट 29.82 लाखांवरून वाढवून 1.78 कोटी; अर्ज 96% नी घटले

जपान सरकार परदेशी स्थलांतरितांबाबत कठोर झाली आहे. यामुळे तेथे सुरू असलेल्या नेपाळी मालकी हक्काच्या हजारो भारतीय रेस्तरॉंवर बंद होण्याची टांगती तलवार आहे. प्रशासनाने रेस्तरॉं मालकांसाठी ‘बिझनेस मॅनेजमेंट’ व्हिसा नियम अचानक कडक केले आहेत. खरं तर, सरकारला संशय आहे की श्रीमंत चिनी गुंतवणूकदार या परमिटचा गैरवापर करण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करत आहेत. हे थांबवण्यासाठी, किमान भांडवलाची…

Read More

भंडारा-गोंदियात राजकीय ट्विस्ट!:भाजपच्या गोटात काँग्रेसचे 'प्लांटेड' नगरसेवक? पटोलेंनी हेरगिरीसाठी पाठवल्याची काँग्रेस जिल्हा महासचिवाची चर्चा

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लाखांदूर नगरपंचायतीच्या चार काँग्रेस नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी, हा पक्षांतर नसून महायुतीच्या गोटात हेरगिरी करण्यासाठी नाना पटोले यांनी खेळलेली ‘स्मार्ट मूव्ह’ असल्याचा दावा काँग्रेसच्या एका जिल्हा महासचिवाने केला आहे. यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या…

Read More

ताडोबाच्या 'झीनत' वाघिणीने ओडिशात 4 बछड्यांना दिला जन्म:देशातील पहिला आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर प्रयोग यशस्वी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल जंगलात स्थलांतरित केलेल्या ‘झीनत’ वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वनविभागाद्वारे राबवलेली आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर मोहीम यशस्वी ठरली आहे. सिमिलीपालमधील वाघांचा वंश सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. सिमिलीपाल अभयारण्यातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील आनुवंशिक दोष टाळण्यासाठी ओडिशा सरकारने ताडोबातून वाघ आणण्याचा निर्णय…

Read More

सोलापूर हादरले!:पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पतीने संपवले जीवन; 6 मिनिटांच्या सुसाईड व्हिडिओमध्ये रडत म्हणाला, "मी तुला आझाद करतोय…"

सोलापूरमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक कलह आणि अपमानातून एका 38 वर्षीय पतीने टोकाचे पाऊल उचलत मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या पत्नीसाठी 6 मिनिटांचा एक अत्यंत भावुक आणि वेदनादायी व्हिडिओ बनवला असून, हा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. जाकीर अब्दुल रज्जाक पटेल असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या…

Read More

चांदी ₹3,300 ने घसरून ₹2.62 लाख प्रति किलो:सर्वकालीन उच्चांकावरून ₹1.24 लाख खाली आली, सोनं 1,030 रुपयांनी घसरून 1.55 लाख रु

सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 3 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,030 रुपयांनी घसरून 1.55 लाख रुपये झाला आहे. 1 किलो चांदीची किंमत 3,300 रुपयांनी कमी होऊन 2.62 लाख रुपयांवर आली आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns…

Read More

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्यांनी माघार घ्यावी, रवींद्र चव्हाण यांची विनंती

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण…

Read More

नातेवाईकांकडे जेवणाचा बहाणा अन् थेट मंदिरात लग्न:विवाहाला विरोध करताच अल्पवयीन नवरीला मारहाण, कुरुंदा पोलिसांत पतीसह 12 जणांवर गुन्हा दाखल

कुरुंदा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातून धोंडे जेवणाला पाहूण्यांकडे जाण्याचे सांगत अल्पवयीन मुलीस थेट सोलापूर येथे नेऊन विवाह लावून दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी बारा जणांवर मंगळवारी ता. 2 रात्री गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सहा महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगी लहानपणापासूनच तिच्या आजोळी शिक्षणासाठी राहात होती. ता. 22 मे रोजी…

Read More