सांगली-सातारा विधान परिषदेत मोठा ट्विस्ट:शिंदे सेनेच्या नेत्याचा बंडाचा झेंडा; जोरदार शक्तीप्रदर्शन करत तानाजी पाटलांचा अर्ज दाखल
राज्यात विधानपरिषद निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये अद्याप खलबतं सुरू असतानाच, सांगली-सातारा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. जागावाटपाचा अंतिम निर्णय होण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण फडकवले आहे. या जागेवर भाजपाचा दावा असताना शिंदेंच्या नेत्याने अर्ज भरल्यामुळे महायुतीत बिघाड होण्याची शक्यता…