Headlines

Admin

पुणे विषारी दारू प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल:गिरीश महाजनांचे आश्वासन, पीडित कुटुंबियांची घेतली भेट

पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारूच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंत स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक…

Read More

अमरावतीमध्ये प्रथमच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कर्मचाऱ्यांच्या बदल्या:जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वात 100% समुपदेशनाने प्रक्रिया पूर्ण

अमरावती: जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या नेतृत्वाखाली अमरावती जिल्हा प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी प्रथमच ऑनलाईन समुपदेशनाने करण्यात आल्या. हा अभिनव प्रयोग राज्यात पहिल्यांदाच राबवण्यात आला असून, यामुळे बदली प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पूर्ण झाली. या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या ४१ कर्मचाऱ्यांपैकी सर्व ४१ कर्मचाऱ्यांची बदली झाली. तसेच, मंडळ अधिकारी संवर्गातील ५ पात्र कर्मचाऱ्यांची, ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील ८२…

Read More

शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाताही:साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा – नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की, शेतकरी केवळ अन्नदाताच नाही तर ऊर्जादाता आणि इंधनदाता देखील आहे. साखर कारखान्यांनी यापुढे केवळ साखर उत्पादनावरच नव्हे, तर उपपदार्थ निर्मितीवरही अधिक भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) वतीने आयोजित साखर आणि जैव ऊर्जा (बायोएनर्जी) यावरील एक दिवसीय…

Read More

किशोर रिठे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार:'सातपुड्याचा सातबारा' ग्रंथासाठी शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मान

अमरावती येथील ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांना महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठित शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित एका समारंभात अभिनेता हृषीकेश जोशी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०२५ मधील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार देण्यात आले….

Read More

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर येथे व्हावे:महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांचे विदर्भ साहित्य संघाला निवेदन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अचलपूर शहरात आयोजित करण्यात यावे, अशी मागणी महानुभाव साहित्याचे अभ्यासक जितेंद्र रोडे यांनी केली आहे. विदर्भ साहित्य संघाच्या नवनियुक्त संचालिका डॉ. जयश्री कुळकर्णी यांच्यामार्फत हे निवेदन संघाकडे सादर करण्यात आले आहे. निवेदनानुसार, अचलपूर नगरीला साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधरस्वामी, ज्येष्ठ साहित्यिक…

Read More

हिंगोलीच्या रिसाला बाजार परिसरातील 535 मालमत्ताधारकांना नोटीस:मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे एसडीओ घुटूकडे यांचे आदेश

हिंगोली शहरातील रिक्षाला बाजार भागात 535 मालमत्ताधारकांना उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी नोटीस बजावली असून मालकी हक्काचे पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या नोटीसमुळे परिसरातील नागरिकांमधून एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहरांमधील अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करून अनेक ठिकाणी अतिक्रमण हटवले आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी…

Read More

पुणे विषारी दारू प्रकरण:गुलाबो गँगचा आक्रोश; पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात महिलांचे आंदोलन

पुणे शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गुलाबो गँग आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशनने पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. शनिवारी शनी मंदिराजवळील कथित दारू विक्री केंद्रासमोर झालेल्या या आंदोलनात महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, विषारी…

Read More

Delhi Court Frames Charges Against Sukesh, Jacqueline in PMLA Case

3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 200 कोटी रुपयांच्या कथित खंडणी प्रकरणात आणि त्यासंबंधीच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणी वाढल्या आहेत. दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने म्हटले आहे की, आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. कोर्टाने सुकेश चंद्रशेखर, लीना मारिया पॉल, जॅकलीन फर्नांडिस यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध धन शोधन प्रतिबंधक कायदा (PMLA) प्रकरणात आरोप निश्चित करण्याचे आदेश…

Read More

IPL फायनल, अहमदाबादची फ्लाइट ₹35,000 पर्यंत महाग:हॉटेलचे भाडे 6 ते 36 हजार पर्यंत पोहोचले; उद्या बंगळुरूचा गुजरातशी सामना

आयपीएलचा अंतिम सामना रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जाईल. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. जर तुम्हालाही हा सामना पाहण्यासाठी विमानाने अहमदाबादला जायचे असेल, तर तुम्हाला 17,000 ते 35,000 रुपयांपर्यंत जास्त भाडे द्यावे लागेल. त्याचबरोबर अहमदाबादमधील मोठ्या हॉटेल्सचे एका रात्रीचे भाडेही ₹36,000 पर्यंत पोहोचले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये दोन्ही संघांना…

Read More

बारामतीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा:ओळखीचा गैरफायदा घेत महिलेच्या घरात शिरला, अश्लील मागणी केल्याचा आरोप

पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात राजकीय पदाचा आणि प्रभावाचा गैरवापर करून एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक किशोर आप्पासाहेब मासाळ यांच्याविरोधात एका ४५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More