साताऱ्यात अंमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश:कराडमध्ये 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज, तर फलटणमध्ये 4 किलो गांजा जप्त
सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ड्रग्ज आणि गांजा जप्त करण्यात आला असून अंमली पदार्थांच्या तस्करीची साखळी तोडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. कराड आणि फलटणमध्ये एमडी ड्रग्जसह गांजा जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, कराडची गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि फलटण पोलिसांनी य कारवाया केल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये 95 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि 4 किलो गांजा…