महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदावर पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर महायुतीच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. कड
.
बच्चू कडूंची नेमकी भूमिका काय?
बच्चू कडू यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, राज्याचा मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा असावा, अशी भावना प्रत्येक शिवसैनिकाची असू शकते. त्यांनी पुढे सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी मिळावी आणि राज्याचे नेतृत्व पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडे यावे, अशी त्यांची वैयक्तिक इच्छा आहे. कडू यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली.
‘फडणवीसांना दिल्लीला पाठवण्याचा अधिकार कोणाला?’
बच्चू कडू यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जावेत की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते म्हणाले, “महायुतीला जनतेने 51 टक्क्यांहून अधिक मतांसह स्पष्ट बहुमत दिले आहे. हे राज्यातील सर्वात मजबूत सरकार आहे. आम्ही एकत्र आहोत. देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला असून राज्याला देशातील अग्रगण्य राज्य बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.” फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
‘गावोगावी मुख्यमंत्रिपदावर चर्चा करू नका’
बावनकुळे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर अप्रत्यक्ष नाराजीही व्यक्त केली. ते म्हणाले की, अशा संवेदनशील विषयांवर सार्वजनिक व्यासपीठावर किंवा गावोगावी चर्चा करून भूमिका मांडणे योग्य नाही. महायुतीमध्ये समन्वय समितीची व्यवस्था आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी योग्य मंच उपलब्ध आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासारख्या विषयांवर सार्वजनिक विधान करताना संयम बाळगण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
‘प्रत्येकाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा वाटते’
मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर बोलताना बावनकुळे यांनी महायुतीतील वास्तव स्वीकारले. “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असते. ती भावना स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीने एकमताने देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली आहे,” असे ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा विषय आता बंद झाला असून सरकार पूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल, असे संकेत त्यांनी दिले.
उदय सामंत यांचेही स्पष्ट मत
बच्चू कडू यांच्या वक्तव्याला शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनीही पाठिंबा दिला. सामंत म्हणाले की, बच्चू कडू यांनी व्यक्त केलेली भूमिका त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा केवळ कडूंचीच नाही तर शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांची आहे. “जशी भाजपच्या कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते, तशीच आमची इच्छा शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी असते,” असे सामंत म्हणाले. मात्र, त्यांनीही ही मागणी वैयक्तिक भावना असल्याचे स्पष्ट केले.
महायुतीत नवा तणाव की केवळ राजकीय भावना?
राजकीय विश्लेषकांच्या मते, बच्चू कडू आणि उदय सामंत यांच्या वक्तव्यांकडे सध्या महायुतीतील संघर्ष म्हणून पाहिले जात नाही. महायुती सरकार स्थापन होताना मुख्यमंत्रीपदावरून मोठी चर्चा झाली होती. अखेर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास दाखवत मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री बदलाची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे.
फडणवीसांचा वाढता राष्ट्रीय प्रभाव
राजकीय विश्लेषकांच्या मते, देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वातील महत्त्वाचे चेहरे बनले आहेत. अनेक राष्ट्रीय बैठका, पक्षाच्या रणनीतीतील सहभाग आणि विविध राज्यांतील निवडणुकांमधील सक्रिय भूमिका यामुळे त्यांचे महत्त्व वाढले आहे. याच कारणामुळे त्यांना केंद्रात जबाबदारी मिळू शकते, अशा चर्चा वारंवार समोर येतात. मात्र सध्याच्या घडीला भाजपचे अधिकृत नेतृत्व महाराष्ट्रातच त्यांच्यावर विश्वास दाखवत असल्याचे चित्र आहे.
संबंधित बातमी
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार!:बच्चू कडू यांचा निर्धार; कर्जमाफीत फसवणूक झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा सरकारला इशारा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेतून एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आले होते. यावर बोलताना बच्चू कउू म्हणाले, पत्रिकेत नाव असो वा नसो, शिंदे लोकांच्या मनात आहेत. आगामी काळात विदर्भाच्या जोरावर एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करणार, असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत फसवणूक झाल्यास सरकारविरोधात अधिवेशनात तसेच थेट रस्त्यावर लढायला तयार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. सविस्तर बातमी वाचा