Headlines

गोरे होण्याच्या नादात मृत्यूच्या दारात;क्रीममध्ये पारा 15,000 पटीने जास्त:दोन हजारांची क्रीम वापरणाऱ्या पुण्याच्या ३ तरुणांना गंभीर आजार




चेहरा गोरा करण्याच्या नादात पुण्याच्या शिक्रापूर परिसरातील ३ तरुणांचे आयुष्य थेट मृत्यूच्या दारात पोहोचले. फेस ब्राइटनिंग नाइट क्रीममुळे त्यांना आजारांनी ग्रासले आहे. त्यांनी चेहऱ्यावर लावलेल्या क्रीमची प्रयोगशाळेत तपासणी केली असता त्यात १५,०९८.६९ पीपीएम एवढा घातक पारा असल्याचे निष्पन्न झाले. एफडीएच्या नियमानुसार क्रीममध्ये पारा केवळ १ पीपीएम मिसळता येईल. मात्र क्रीममध्ये प्रमाणापेक्षा पारा १५००० पट जास्त असल्याने तरुण अत्यवस्थ झाले. आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. क्रीम लावल्यानंतर काही दिवसांनंतर चेहऱ्याला सूज आली, किडनीलाही सूज आली, हाडांमध्ये वेदना होऊ लागल्या, रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या, श्वास घेण्यास त्रास व लघवी करताना त्रास होत होता. या तिन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार करावे लागले. त्या तरुणांशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधला असता त्यांनी आपबिती कथन केली. दोन हजारांची क्रीमसाठी उपचारावर प्रत्येकी ७ लाख खर्च करावा लागत आहे. क्रीमच्या उत्पादनावर तातडीने प्रतिबंध घालण्याबाबत बेंगळुरू प्रशासनाला कळवल्याची माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश होकरे यांनी दिली. केस 1 : प्रथमेश फडतरे, (वय २१) मलढाण फाटा, शिक्रापूर, पुणे मित्रांच्या सल्ल्याने क्रीम लावल्याने पायाला सूज चेहरा उजळेल म्हणून मित्राच्या सांगण्यावरून एका मेडिकलमधून ही क्रीम घेतली. महिनाभर वापरल्यानंतर पायाला सूज आली, मणक्यात वेदना सुरू झाल्या आणि श्वास घेणे कठीण झाले. डॉक्टरांचा सल्ला न घेताच क्रीम लावल्याने मृत्यूच्या दारात पोहोचलो. केस 2 : वैभव भुजबळ, (वय २४) तळेगाव ढमढेरे, पुणे कोलेस्टेरॉल ४०० पार, गाठी झाल्या, उपचाराने बचावलो माझे काही मित्र ही क्रीम वापरतात. त्यांचे पाहून मी क्रीम विकत आणली. ती लावल्यानंतर चेहरा सुजला. डॉक्टरांकडे गेलो. किडनीवर सूज आली, फुफ्फुसात रक्ताच्या गाठी झाल्या होत्या. कोलेस्टेरॉल ४०० पार गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वेळीच उपचार झाल्याने बचावलो. डॉ.नचिकेत पळसकर, त्वचारोगतज्ज्ञ
आर्सेनिक पारा नसल्याची खात्री करूनच क्रीम वापरा आरोग्यास घातक असे कोणते घटक या क्रीममध्ये होते?
-पारा, आर्सेनिक आणि शिसे यांसारखे विषारी धातू क्रीममध्ये होते. शरीरावर परिणाम काय होतो?
-किडनी व हृदय निकामी होणे, हाडांमध्ये तीव्र वेदना होणे, शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन प्रकृती गंभीर होण्याचा धोका होतो. कोणती क्रीम वापरायला हवी?
-कोणतीही क्रीम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावी. या क्रीममध्ये आर्सेनिक, पारा व घातक धातू नसल्याची खात्री करूनच क्रीम वापरावी. तरीही त्रास झाल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *