![]()
परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने पुरती दडी मारल्यामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतातील जमिनींना मोठ्या भेगा पडल्या असून मका, कापूस, तूर, मूग व सोयाबीन ही पिके डोळ्यांसमोर करपून जात आहेत. जीवापाड जपलेली पिके सुकत असल्याचे पाहून बळीराजा हताश झाला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून महागडी बियाणे आणि खते शेतात टाकून पिके कशीबशी जगवली होती. मात्र, पावसाचा इतका मोठा खंड पडल्यामुळे बळीराजावर अथांग आर्थिक संकट कोसळले आहे. सध्या शेतातील विहिरी, शेततळे, बोअरवेल आणि स्थानिक तलावांतील पाण्याचे स्त्रोत पूर्णपणे आटले आहेत. दररोज हवामान खात्याच्या अंदाजाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी आता हवालदिल झाला असून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आहे. पावसाअभावी केवळ पिकांचेच नव्हे, तर आगामी काळात पिण्याच्या पाण्याचेही भीषण संकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे राज्य शासनाने वैजापूर तालुक्यात व बोर दहेगाव परिसरात तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा मागणी आहे.
Source link
बोरदहेगाव परिसरामध्ये 60 दिवसांपासून पावसाचा खंड:खरीप हंगामातील पिके करपली, मोठ्या पावसाची प्रतीक्षा