![]()
दहिगाव शिवारात गुरुवारी वीज कोसळून मनोहर दुधे व पर्वताबाई दुधे या शेतकरी दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. दहिगाव येथे आमदार अब्दुल सत्तार यांनी दुधे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. या घटनेत जखमी झालेला दाम्पत्याचा मुलगा पंढरी मनोहर दुधे याचीही त्यांनी भेट घेऊन विचारपूस केली व वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले. मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. तसेच संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना या प्रकरणाची तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या वेळी तहसीलदार सागर वाघमारे, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, एपीआय रवींद्र ठाकरे, मंडळ अधिकारी काशिनाथ ताठे, कृषी मंडळ अधिकारी मीनाक्षी ठाकरे, सरपंच नाना पांढरे, उपसरपंच किरण ब्राह्मणे, सोसायटी चेअरमन विठ्ठल डमाळे, पोलिस पाटील रत्नाकर सुरडकर, कौतिक पांढरे, शरीफ देशमुख, रामदास सरोदे, सुखदेव दुबे, संजय साखरे व तलाठी अंकुश साबळे यांची उपस्थिती होती.
Source link
सिल्लोड:मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे मदत मिळवून देण्यास प्रयत्नशील