![]()
आमदार अनुराधा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत अप्पासाहेब दादाराव पाटील बारबैले मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लामकाना येथे सुमारे ३० हजार रुपये किमतीचे सीसीटीव्ही कॅमेरे भेट देण्यात आले. तसेच प्रेरणा फाउंडेशनचे भाऊसाहेब मते, ऋषिकेश देशपांडे आणि शालेय शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने शाळेला सुमारे ४० हजार रुपयांची साऊंड सिस्टीम प्रदान करण्यात आली. ७० हजार रुपये मूल्याच्या या सुविधांमुळे शाळेच्या सुरक्षेशी जोडलेली गरज भागण्यासोबतच शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना मोठी गती मिळणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शालेय परिसरातील सुरक्षितता बळकट होईल, तर साऊंड सिस्टीममुळे दैनंदिन प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवणे शक्य होणार आहे. दानशूर व्यक्ती व संस्थांचे हे सहकार्य शैक्षणिक विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या सामाजिक उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने सर्व दात्यांचे आभार मानण्यात आले. याप्रसंगी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष बाबूराव बारबैले, उपसरपंच अप्पासाहेब बारबैले, गौतम घोरपडे, मुख्याध्यापक संजय बुचुडे, सुरेश मांटे, सुप्रिया सोसे, जयश्री चाटे आणि अनिता पडघन यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शालेय परिसरातील सुरक्षितता बळकट होईल, तर साऊंड सिस्टीममुळे दैनंदिन प्रार्थना, सांस्कृतिक कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवणे शक्य होणार आहे. दानशूर व्यक्ती व संस्थांचे हे सहकार्य शैक्षणिक विकासासाठी प्रेरणादायी असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या विकासाला मिळणार चालना समाजातील दानशूर व्यक्ती आणि विविध संस्थांनी शाळांच्या गरजा ओळखून सहकार्याचा हात पुढे करणे, ही शैक्षणिक विकासासाठी निश्चितच अत्यंत प्रेरणादायी बाब ठरत आहे. याच सामाजिक बांधिलकीतून लामकाना येथील शाळेला एकूण ७० हजार रुपये मूल्याचे शैक्षणिक साहित्य व आधुनिक सुविधा भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि डिजिटल साऊंड सिस्टीमचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व सांस्कृतिक विकासाला मोलाची साथ मिळणार आहे.
Source link
लामकाना शाळेला 70 हजारांचे साहित्य भेट:शाळेला मिळणार सुरक्षा, अप्पासाहेब दादाराव पाटील बारबैले मित्रमंडळाने घेतला पुढाकार