![]()
पैठण औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पहिल्या घटनेत इसारवाडी येथील अंबिका हॉटेलजवळ १८ सप्टेंबर २०२६ रोजी दारूसाठी पैसे न दिल्याने अनिस अजमोद्दीन शेख (२६, रा. मुधलवाडी) यांना सराईत गुन्हेगार संतोष कल्याण बोबडे (रा. धनगाव) याने लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपीवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हेडकॉन्स्टेबल करतारसिंग सिंगल करत आहेत. दुसऱ्या घटनेत परिसरातील एका गावात जुलै ते १८ सप्टेंबर दरम्यान एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिचा मानसिक-शारीरिक छळ केल्याप्रकरणी सलमान पठाण याला पोलिसांनी तातडीने अटक केली आहे. त्याने मुलीला पळून जाऊन लग्न करण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली होती. सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत मोरे, पोलिस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, कविता जगताप व राहुल महोतमल यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिस प्रशासन दोन्ही प्रकरणांवर लक्ष ठेवून आहे.
Source link
इसारवाडीमध्ये दारूसाठी पैसे न दिल्याने मारहाण:पैठण एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल