![]()
विद्यार्थ्यांना लोकशाही व्यवस्था आणि मतदानाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, या उद्देशाने पैठण तालुक्यातील विवेकानंद शिक्षण संस्था संचलित तुकाराम हायस्कूल, ढाकेफळ येथे विद्यार्थी संसद निवडणूक उत्साहात पार पडली. मुख्याध्यापिका मनीषा वासडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी या आनंददायी उपक्रमात भाग घेतला. निवडणुकीत ११-११ सदस्यांचे तीन पक्ष बॅट, फुटबॉल आणि पुस्तक या चिन्हांवर रिंगणात होते. मतदानासाठी दोन स्वतंत्र बूथ उभारण्यात आले होते. केंद्र १ वर केंद्राध्यक्ष मच्छिंद्र पाटील, मतदान अधिकारी महेश घनवट व सचिन वाघमोडे यांनी, तर केंद्र २ वर केंद्राध्यक्ष साहेबराव सोनटक्के, अधिकारी श्रीकांत कानडे व रमेश गोरे यांनी जबाबदारी सांभाळली. दहावीतील प्रथमेश महेंद्र भागवत याच्या नेतृत्वाखालील बॅट पक्षाने ११ जागांवर विजय मिळवत बहुमत पटकावले. ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी साजेद सय्यद, गणेश भडके आणि मिडल विभागप्रमुख रवींद्र देसले यांनी विशेष मेहनत घेतली. विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापिका मनीषा वासडीकर, मच्छिंद्र पाटील, रवींद्र देसले, क्रीडाशिक्षक हरिभाऊ शिसोदे, अण्णासाहेब नवले, रवींद्र थोटे आणि मुबीन शेख यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले.
Source link
तुकाराम हायस्कूलमध्ये विद्यार्थी संसद निवडणूक:ढाकेफळ येथे मतदान घेऊन पार पडली प्रक्रिया