![]()
जिल्ह्यात पावसाने दीर्घ दडी मारल्याने खरीप पिकांवरील संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील ४० महसूल मंडळांत तब्बल २१ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे अनेक भागांत पिके वाळण्यास सुरुवात झाली असून सोयाबीनच्या उत्पादनात सुमारे ६० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यासाठी पथकांची नियुक्ती करण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश मिळताच पंचनामे सुरू केले जाणार आहेत. जिल्ह्यात यंदा ६.३७ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. त्यापैकी १.१८ लाख हेक्टरवरील पिके वाळल्याची माहिती आहे. म्हणजेच जिल्ह्यातील एकूण पेरणी क्षेत्राच्या १९ टक्के क्षेत्राला पावसाच्या खंडाचा फटका बसला आहे. अद्याप आदेश आलेले नाहीत महसूल विभाग, कृषी विभागासह इतर संबंधित विभागांच्या पथकांमार्फत पंचनामे करण्यात येतील. वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप आदेश मिळालेले नाहीत. आदेश मिळताच पंचनामे सुरू करण्यात येतील. – दीपक गवळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर
Source link
जिल्ह्यात 40 महसूल मंडळांत 21 दिवसांपासून पावसाचा खंड:शासनाकडून आदेश मिळताच पंचनामे सुरू केले जाणार