मुंबईतील चेंबूर परिसरात एका शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून ११ वर्षीय शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना मंगळवारी (२३ जुलै) घडली होती. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते. नागरिका
.
दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
चेंबूर दुर्घटनेप्रकरणी आतापर्यंत महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे:
अरुण मुंढे (उपअभियंता, रस्ते व वाहतूक विभाग): एम/पश्चिम विभागाचे उपअभियंता अरुण मुंढे यांना कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. मुख्य अभियंता (रस्ते व वाहतूक) यांनी बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. जोपर्यंत या प्रकरणाची प्राथमिक विभागीय चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहणार आहे.
जगदीश भोईर (सहाय्यक अधीक्षक, उद्यान विभाग): यापूर्वीच उद्यान विभागाचे सहाय्यक अधीक्षक जगदीश भोईर यांनाही याच प्रकरणात निलंबित करण्यात आले होते.
नेमकी दुर्घटना आणि पालिकेचा भोंगळ कारभार
मंगळवारी दुपारी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या एका स्कूल बसवर भलेमोठे पिंपळाचे झाड कोसळले. या अपघातात बसमधील एका 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी पालिकेच्या स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडताना सभागृहनेते गणेश खणकर यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा पाढाच सभागृहात वाचला.
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे दुर्घटनेत जे झाड कोसळले, त्या झाडाच्या सद्य:स्थितीबाबत आणि धोक्याबाबत ‘एम/पश्चिम’ विभागाच्या उद्यान अधिकाऱ्यांनी रस्ते विभागाला आधीच पत्र लिहिले होते. तरीही रस्ते विभागाने त्यावर कोणतीही वेळीच कार्यवाही केली नाही, आणि त्यामुळेच या निष्पाप विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला, असे स्पष्ट झाले आहे.
सखोल चौकशीसाठी समिती गठीत; 8 दिवसांत अहवाल
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्तांनी एका विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीने आपला अहवाल पुढील 8 दिवसांत सादर करण्याचे कडक आदेश आयुक्तांनी दिले आहेत. चौकशी दरम्यान समितीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि भविष्यात मुंबईत अशा घटना घडू नयेत, यासाठी योग्य त्या शिफारसी कराव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत. प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांचे निलंबन केले जात असून, या कामाशी संबंधित असणाऱ्या कंत्राटदाराविरोधातही महानगरपालिकेकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
संबंधित बातम्या वाचा…
मुंबई- विहानचा क्रिकेट बॉलसह अंत्यसंस्कार:आई बॅट छातीशी धरून बसली होती; एक दिवसापूर्वी शाळेच्या बसवर झाड पडल्याने त्याचा मृत्यू झाला होता

मुंबईत स्कूल बस अपघातात जीव गमावलेल्या विहान श्रीवास्तवचे बुधवारी अंत्यसंस्कार झाले. यावेळी त्याच्यासोबत क्रिकेट बॉल ठेवण्यात आला होता. विहानच्या कुटुंबीयांनी सांगितले, ‘त्याला क्रिकेट खूप आवडत होते आणि त्याचे स्वप्न व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्याचे होते, पण या अपघाताने त्याची सर्व स्वप्ने संपवली.’ नातेवाईक अनिलने सांगितले की, त्याची आई जुहीला अजूनही विश्वास बसत नाहीये की तिचा मुलगा या जगात नाही. ती घरात मुलाचे क्रिकेट बॅट छातीशी कवटाळून बसली आहे. ती वारंवार हेच म्हणत आहे की विहान आता खेळायला जाईल. येथे वाचा संपूर्ण बातमी
झाड पडणार हे आधी कसं कळणार?:चेंबूर दुर्घटनेनंतर मंत्री संजय शिरसाटांच्या वक्तव्यावरून नवा वाद, विरोधक आक्रमक

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर मोठे झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. “झाड पडणे किंवा वीज पडणे या गोष्टी माणसाच्या हातात नसतात. कोणते झाड कधी पडणार हे आधी कसे कळणार?” असे शिरसाट यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप केला आहे. वाचा सविस्तर
चेंबूरमध्ये मोठी दुर्घटना!:स्कूल बसवर मोठे झाड उन्मळून पडले, 4 विद्यार्थी जखमी; 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबईतील चेंबूर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण आणि धक्कादायक दुर्घटना घडली आहे. येथील ११ नंबर रोडवर शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका खाजगी स्कूल बसवर रस्त्याच्या कडेला असलेले एक अवाढव्य झाड अचानक उन्मळून कोसळले. या दुर्दैवी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून, ४ शाळकरी मुले गंभीर जखमी झाली आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी