ऑस्ट्रेलियात सन्मान, राणी मुखर्जी भावुक:प्रतिष्ठित लॉ विद्यापीठाकडून सर्वोच्च सन्मान मिळाला; शाहरुख खाननंतर सन्मान मिळवणारी दुसरी भारतीय कलाकार
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांना ऑस्ट्रेलियाच्या ला ट्रोब युनिव्हर्सिटीने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ (D.Litt.) या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे. मंचावर हा सन्मान स्वीकारताना राणी मुखर्जी भावुक दिसल्या. मेलबर्नमधील फेडरेशन स्क्वेअर येथे इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न (IFFM) 2026 दरम्यान 14 ऑगस्ट रोजी आयोजित समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. त्यांना तीन दशकांच्या कारकिर्दीतील…