Headlines

देशात आग लावून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा प्लॅन:देशभरात 'कोश्यारी' नेमून लोकशाहीची गळचेपी, हिंदुत्वाच्या सातबाऱ्यावर केवळ भाजपचे नाव नाही- संजय राऊत

ट्रम्प यांनी धमकी दिल्याने ऑपरेशन सिंदूर थांबवले, आमच्या सत्ताधाऱ्यांनी इराणकडून काही धडे घेतले पाहिजे, असे उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर केंद्र सरकारला वाटते की पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार घडला पाहिजे आणि त्याचे लोण देशभरात गेले पाहिजे ही येणाऱ्या निवडणुकीची भाजपकडून तयारी सुरू आह, असेही राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की,…

Read More

मिशन कन्व्हर्जनची सूत्रधार निदा खान?:नाशिक TCS प्रकरणात SIT च्या तपासातून धक्कादायक माहिती; टार्गेट देऊन धर्मांतराचा कट?

नाशिकमधील टीसीएस कंपनीशी संबंधित कथित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणाने आता आणखी गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्याकडेच कथित मिशन कन्व्हर्जनची जबाबदारी सोपवण्यात आल्याचा संशय विशेष तपास पथकाने व्यक्त केला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून, तपास यंत्रणांनी आपला फास अधिक घट्ट केला आहे. सध्या…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:गावातले लोक आपल्या मुलांना घराबाहेर खेळण्यासाठीही पाठवत नाहीत, चिमुकलीवर अत्याचाराची सहा दिवसांनंतरही नसरापूर गावात दहशत कायम

पुणे-सातारा महामार्गावरील 3500 लोकसंख्येचं नसरापूर गाव… गावात सिमेंटचे गुळगुळीत लांबलचक रस्ते. पण रस्त्यांवर चिटपाखरूही नाही. एकही मूल खेळताना दिसत नाही. सुरुवातीला असं वाटलं वैशाखातील रखरखत्या उन्हामुळं आई-बाप मुलांना घराबाहेर पाठवत नसावेत. पण हळूहळू गावकरी बोलू लागतात. त्यांच्या बोलण्यातून कळतं की, आई-बापच मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठवत नाहीयेत. कारण सहा दिवस उलटून गेले तरी या गावात त्या…

Read More

सोनगाव-सात्रळ,धानोरेत चोरट्यांची दहशत:काठ्या घेत नागरिकांची गस्त, महिलांमध्ये भीतीचे सावट; स्वतंत्र पोलिस ठाण्याची मागणी

गेल्या दोन आठवड्यांपासून प्रवरा परिसरातील सोनगाव-सात्रळ-धानोरे या पंचक्रोशीत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सततच्या चोरीच्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण असून, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या अपुऱ्या गस्तीमुळे नागरिक आता स्वतःच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरले असून, रात्री गस्त घालत आहेत. सोनगाव, सात्रळ आणि धानोरे ही गावे संगमनेर, राहाता व राहुरी अशा तीन तालुक्यांच्या सीमेवर आहेत. भौगोलिकदृष्ट्या…

Read More

जमीन व्यवहार ‘कायदेशीर’ असल्याचा भोंदू खरातचा दावा:मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका‎बदलली; सावकारकीचे आरोपही फेटाळले‎

शिर्डीतील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार आणि सावकारकी प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. जमीन खरेदी आणि कथित व्याज व्यवहाराबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिस चौकशीत खरातने शिर्डीतील जमीन खरेदी नियमानुसार व कायदेशीर प्रक्रियेतून झाली असल्याचा दावा केला आहे….

Read More

व्यसनमुक्तीतून समृद्ध कामगार जीवनाचा मार्ग:बार्शी नगरपालिकेत जनजागृती कार्यशाळा‎‎

कामगार दिनाचे औचित्य साधून बार्शी नगरपालिका व आयुष व्यसनमुक्ती उपचार केंद्र, जामगाव (ता. बार्शी) यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती विषयक जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कामगार वर्गामध्ये वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबविणे व आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे, हा उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यशाळेत मार्गदर्शन करताना मान्यवरांनी व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणाम यावर…

Read More

शहरातील विजेच्या समस्या सूक्ष्म नियोजन करून तातडीने सोडवाव्या:खा. बळवंत वानखडे यांची बैठकीत महावितरण आधिकाऱ्यांना सूचना‎

शहरात दिवसेंदिवस विद्युत विषयक समस्या वाढत आहेत. ऐन उन्हाळ्यात शहरातील वडाळी , बुधवारा , बिच्चू टेकडी , जवाहर स्टेडियम , फ्रेजरपुरा , चपराशीपुरा , पश्चिम क्षेत्र या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे. रोहित्र ओव्हरलोड होणे , विद्युत दाब कमी जास् . उन्हाळ्याच्या दिवसांत विजेची मागणी वाढली असताना शहरात विद्युत विभागाच्या विविध विद्युत विषयक समस्या…

Read More

"मजीप्रा'त ठिय्या; अभियंत्यांना नळ, पाइप, माठ दिला भेट:बांगड्या घालण्याचाही प्रयत्न; 5 दिवसांनी पाणी देण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन‎

उन्हाळा तीव्र होत असतानाच २५ दिवसांनंतरही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अकोला तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. पाण्यासाठी असलेले पाइप, नळ व माठ अभियंत्यांना भेट देत अनोख्या पद्धतीने पाणी मिळत नसल्याचा निषेध केला. अभियंत्यांना धारेवर धरत जाबही…

Read More

105 रुपयांचा विक्रमी दर! श्रीगोंद्याच्या मातीत पिकली "कोटींची द्राक्षं':पारगाव सुद्रिक येथील युवा शेतकरी मोहन जगताप यांची यशोगाथा

जिद्द, चिकाटी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर मातीतून सोनं उगवता येतं, हे श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील प्रगतशील शेतकरी मोहन ईश्वर जगताप यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कोरोनाचे संकट, अवकाळी पावसाचा तडाखा आणि कोसळलेले बाजारभाव अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जगताप यांनी द्राक्ष शेतीतून कोटींची उलाढाल केली. सध्या संपूर्ण परिसरात त्यांच्या यशाची चर्चा…

Read More

विद्यार्थ्यांनो, अभ्यासासोबतच कलागुण आत्मसात करा- पोलिस निरीक्षक सानप:कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात‎

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच ईतरही कलागुणांना आत्मसात करावे. पुढील काळ स्पर्धेचा, ताणतणावाचा असल्याने कला आपल्याला समाधान देते असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक रघुनाथ सानप यांनी येथे केले. कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक आर.बी. सानप तर प्रमुख पाहुणे म्हणून रामनाथ टेकाळे, कृषीतज्ञ चंद्रकांत क्षीरसागर उपस्थित होते. मान्यवरांचे प्रभारी प्राचार्य बी.सी. सरोज…

Read More