Headlines

कर्जत-जामखेडला अखंडित वीज द्या:प्रा. राम शिंदे यांचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कडक निर्देश, महावितरणचा घेतला समाचार

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे व…

Read More

पुण्यात एकमेकांकडे बघण्यावरून वाद; तरुणाचा खून:चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात, निरीक्षण गृहात रवानगी

पुण्यातील धनकवडी परिसरातील आंबेगाव पठार भागात एकमेकांकडे बघण्याच्या वादातून एका १८ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला आहे. सिमेंटचा गट्टू डोक्यात घालून आणि तीक्ष्ण शस्त्राने वार करून हा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. नयन सचिन जाधव (वय १८, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव…

Read More

पुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल काम करा:राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांचे निर्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पुणे जिल्ह्यात एक आदर्श (मॉडेल) काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले आहेत. या मॉडेलची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह…

Read More

कर्जत-जामखेडचा वीज प्रश्न मार्गी लावा:सायंकाळी 6 ते 10 दरम्यान अखंडित वीज द्या, सभापती राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वीज वितरण कंपनीला दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण…

Read More

जळगाव हादरले!:प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; आरोपीला बेड्या

नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात महिलांवरील अत्याचार आणि आक्षेपार्ह व्हिडिओंच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या घटनेनंतर आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेम प्रकरणाचा बहाणा करून एका तरुणीला जाळ्यात ओढणाऱ्या यश जैन नावाच्या तरुणाने तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तब्बल 7 लाखांची…

Read More

पुण्यातील पाणीकपात 31 मेपर्यंत रद्द:महापौर मंजुषा नागपुरे यांचे निर्देश, मान्सूनपूर्व पाणीपुरवठा आढावा बैठकीत निर्णय

पुणे महानगरपालिका हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मंगळवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. या बैठकीत महापौरांनी ३१ मेपर्यंत पाणीकपात रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार यंदा ९२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या पुणे शहराला दररोज १५६० एमएलडी पाण्याची गरज आहे, तर धरणांमध्ये १०.२६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे….

Read More

फडणवीसांचे राक्षसी वृत्तीचे सरकार आपटावेच लागेल:राज्यातील गुन्हेगारीवरून मनोज जरांगेंची टीका, बंगालच्या निकालावरही संशय व्यक्त

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलथवून टाकत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयावरून विरोधकांनी केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा आरोप केला असतानाच, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनीही भाजपच्या या यशावर संशय व्यक्त केला आहे. याचवेळी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून त्यांनी थेट…

Read More

गडचिरोलीत 'नीट' परीक्षेत हायटेक कॉपी:AI च्या मदतीने उत्तरे शोधणाऱ्या दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा, शिवाजी महाविद्यालयाच्या केंद्रावरील प्रकार

देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘नीट’ परीक्षेत गडचिरोली शहरात हायटेक कॉपीचे रॅकेट उघड झाले आहे. ३ मे रोजी पार पडलेल्या या परीक्षेत मोबाईल पोलिस एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर सोडवणाऱ्या एका विद्यार्थिनीला पोलिस एका अल्पवयीन विद्यार्थ्याला पकडण्यात आले आहे. याप्रप्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात ‘सार्वजनिक परीक्षा कायदा २०२४’ नुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत….

Read More

साधना सप्ताहातील उल्लेखनीय कामगिरी:हिंगोलीच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचा शुक्रवारी मुंबईत होणार गौरव

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना पुरस्कार जाहिर झाला असून शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने मिशन…

Read More

भोंदूबाबाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पालघर जिल्ह्यातील संतापजनक घटना; भोंदू नराधमांना कायद्याचा धाक नाही – रोहित पवार

पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्यात भोंदू नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू…

Read More