Headlines

Sunetra Pawar Completes Census 2027 Self-Enumeration; Urges Public Participation

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी ‘जनगणना २०२७’ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली आहे. त्यांनी नागरिकांना या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. . सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ‘जनगणना २०२७’ ही केवळ आकडेवारीची नोंदणी नाही, तर शाळा, रुग्णालये आणि विविध कल्याणकारी योजनांची सुनिश्चिती करते. राज्यातील प्रत्येक व्यक्ती आणि कुटुंबाला पायाभूत सुविधांचा…

Read More

अंजली भागवत, सुंदर अय्यर यांना सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार:पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून पुरस्कार प्रदान

भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष आणि दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर यांना जाहीर झाला आहे. पुणे हौशी ॲथलेटिक संघटनेतर्फे यंदापासून हे पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ…

Read More

हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन:थकीत देयक तातडीने अदा करण्याची मागणी, देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे

हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीकडे असलेले सुमारे १० कोटी रुपयांचे देयक तातडीने अदा करावे यासह इतर मागण्यांसाठी इलेक्ट्रीकल कंत्राटदारांनी शुक्रवारपासून ता. १ कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात वीज कंपनीची देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यात इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडून वीज कंपनीच्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसह रो्हित्र दुरुस्ती, वीज वाहिन्या अंथरणे, खांब…

Read More

महाराष्ट्र दिनी संविधान चौकात काळे फुगे सोडले:विधानसभेवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; 10 जण अटकेत

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआस) तीव्र निदर्शने केली. संविधान चौकात काळे फुगे सोडून आणि विधानसभेच्या गेटवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करून ‘महाराष्ट्र निषेधदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, तारेश…

Read More

चाकण हादरले!:3 वर्षांच्या बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून गळा चिरला, मृतदेह सुटकेसमध्ये दडपला

पुण्यातील चाकण औद्योगिक पट्ट्यातील दक्षिण महाळुंगे परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तीन वर्षांच्या बालकावर अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सुटकेसमध्ये बंद करून ठेवण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने प्रथम बालकावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर गळा चिरून…

Read More

उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे गेला:ते अडीच वर्षे घरी बसले हे राऊत अभिमानाने सांगतात- नवनाथ बन

अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे घरी बसले हे संजय राऊत अभिमानाने सांगत आहेत. शरद पवारांनी लिहलेले पुस्तक वाचा, जेव्हा गरज होती त्यावेळी मुख्यमंत्री घरात बसले असा उल्लेख त्यांनी केला आहे आणि उद्धव ठाकरेंच्या कारभारावर टीका केली, असे भाजप्र प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्र अडीच वर्षे मागे…

Read More

लालपरीचा प्रवास महागणार:स्वच्छतेसाठी प्रवाशांवर 2 रुपयांचा अधिभार आणि मोफत शौचालये; एसटीत मोठे बदल जाहीर

महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास आता काहीसा महाग होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्याचा मोठा निर्णय घेतला असला, तरी त्यासाठी तिकीट दरात वाढ होणार असल्याने प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. स्वच्छता आणि सुविधा सुधारणा या उद्देशाने तिकीटावर स्वच्छता अधिभार लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या…

Read More

भोंदू अशोक खरातला 9 व्या गुन्ह्यात पोलिस कोठडी:रूपाली चाकणकरांच्या बहिणीची 'ईडी'कडून चौकशी होणार

अनेक निष्पाप लोकांना मृत्यूची भीती दाखवून लुटणाऱ्या भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवव्या गुन्ह्यात त्याला न्यायाधीश बी. बडवे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे आता राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले असून, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावले…

Read More

अंबादास दानवे यांच्या पत्नीच्या नावावर मर्सिडीज बेन्झ:संपत्तीतही मोठी वाढ; विधान परिषद उमेदवारांच्या संपत्तीची मोठी झेप

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. 30 एप्रिल हा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ठरला असून 12 मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होत असून, भाजपकडून 5, शिवसेना शिंदे गटाकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 1 आणि शिवसेना ठाकरे गटाकडून 1…

Read More

कृषी क्रांती; बळीराजाची वाटचाल आधुनिकतेकडे:'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) ठरणार शेतकऱ्यांचा नवा 'स्मार्ट' साथीदार!

मानवजातीच्या इतिहासात शेती हा केवळ उदरनिर्वाहाचा व्यवसाय नसून सभ्यतेचा कणा राहिला आहे. पहिल्या कृषी क्रांतीने मानवाला स्थैर्य दिले, दुसऱ्या कृषी क्रांतीने उत्पादनक्षमता वाढवली, आणि तिसऱ्या म्हणजे हरित क्रांतीने अन्नसुरक्षेची हमी निर्माण केली. या तीन टप्प्यांनी शेतीला पारंपरिक पद्धतीतून आधुनिकतेकडे नेले. आता आपण एका नव्या टप्प्यावर उभे आहोत, ती म्हणजे चौथी कृषी क्रांती, जी तंत्रज्ञान, डेटा…

Read More