Headlines

कोंढव्यात हिंदूंना शोधण्यासाठी आता दुर्बिण लावावी लागेल:2047 पर्यंत देश इस्लाम राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र, कोंढव्याच्या मुद्द्यावरून नीतेश राणे आक्रमक

पुण्याच्या कोंढव्यामध्ये आता हिंदूंना शोधण्यासाठी दुर्बिण लावावी लागत आहे. देशाला 2047 पर्यंत ‘इस्लाम राष्ट्र’ बनवण्याच्या दृष्टीकोनातून काही शक्ती काम करत आहेत. या शक्तींनी काही विशिष्ट भागांवर आपले लक्ष केंद्रित केले असून, त्यामध्ये पुण्याच्या कोंढवा परिसराचा प्रामुख्याने समावेश आहे, असे मंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या घडामोडींवर टीका करताना राणे म्हणाले की,…

Read More

सिद्दीकींना भावूक होऊन नाही, तर मेरिट पाहून उमेदवारी- मंत्री भरणे:म्हणाले- अमोल मिटकरींचा 'गैरसमज' झाला असावा

विधान परिषद निवडणुकीसाठी माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच अजित पवार गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे आक्रमक आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्याला डावलल्याची खंत व्यक्त करत थेट बंडाचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मैदानावर उतरत हा निर्णय भावनेच्या भरात नाही, तर मेरिटवर आधारित आहे, असे…

Read More

भोर हादरलं!:4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, आरोपीस बेड्या, ग्रामस्थांचा पोलिस ठाण्याबाहेर संताप

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजीकडे सुट्टीसाठी आलेल्या एका अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरला असून परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, संतप्त ग्रामस्थांनी चिमुकलीचा मृतदेह…

Read More

महायुतीत वर्चस्वाचा छुपा संघर्ष:छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदारांविरोधात भाजपची तगडी मोर्चेबांधणी, विरोधक नामशेष, आता लक्ष्य मित्रपक्ष!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीचे नेते एकत्र असल्याचे दावे करत असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तावाटपातून एक वेगळीच राजकीय ठिणगी पडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतील महत्त्वाची पदे वाटताना भारतीय जनता पक्षाने ज्या पद्धतीचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ आखले आहे, ते पाहता मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघातच भाजपने आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः ज्या…

Read More

पुण्यातील भोरमध्ये माणुसकीला काळिमा!:65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या, गावकऱ्यांचा संताप

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निष्पाप चिमुकलीवर नराधमाने आधी अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याचे उघड झाले असून, या पाशवी कृत्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. नसरापूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका…

Read More

1.40 कोटींची ऑनलाईन फसवणूक:पुणे सायबर पोलिसांकडून सातारा येथून एकाला अटक

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी एका आरोपीला सातारा येथून अटक केली आहे. सुशांत हनमंत निकम (वय ३८, रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात, आरोपींनी फिर्यादीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. त्यांना ‘तायकुन कॉईन कंपनी’ मार्फत…

Read More

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू

नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास ‘कलिंग ऑपरेशन’ (पक्षी नष्ट करण्याची मोहीम) अधिकृतपणे सुरू केली आहे. शहरालगतच्या तीन प्रमुख पोल्ट्री फार्मचे नमुने पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाचे 40 कर्मचारी 10 अधिकारी…

Read More

ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता एक सरकारला दिला आहे. पत्रादेवी ते पवनार हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना…

Read More

मंत्री झिरवाळांनी हिंगोलीकरांच्या भावना दुखावल्या:कयाधूचे पाणी इसापूर मार्गे नांदेडला वळवण्याच्या विधानावर वाद होण्याची शक्यता

कयाधूच्या पाण्यावरून पालकमंत्री झिरवळांच्या वक्तव्याने नवा वाद उभा राहण्याची चिन्हे, हिंगोलीत मुबलक पाणी असेल तर त्यांनी पाणी न्यावे ः पालकमंत्री झिरवाळ हिंगोली जिल्ह्यातील कयाधूच्या पाणी प्रश्‍नावरर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. “हिंगोली जिल्ह्यातील सिंचनासाठी तसेच पाण्याची तहान भागत असेल तर इतर पाणी त्यांनी पाणी न्यावे,” असे विधान करत त्यांनी शेतकऱ्यांच्या…

Read More

मिसिंग लिंक नाही, तर कनेक्टिंग लिंक म्हणा:मुख्यमंत्र्यांचे आवाहन; तत्कालीन ठाकरे सरकारची 13 कारणे फेटाळली, सुप्रिया सुळेंनाही प्रत्युत्तर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित 13 किमी लांबीच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या मार्गाला आतापर्यंत मिसिंग लिंक, म्हणून ओळखले जात होते. मात्र उद्घाटनावेळी फडणवीस यांनी याला कनेक्टिंग लिंक, म्हणावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाल्याने महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आणि त्यामुळे लोकार्पणाचा कार्यक्रम नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू…

Read More