Headlines

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश भोईटे यांचे निधन:वयाच्या 60 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; पुणे श्रमिक पत्रकार संघाचे होते माजी अध्यक्ष

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश ज्ञानेश्वर भोईटे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघाचे आणि पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, वडील, तीन भाऊ आणि पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोथळे येथे अंत्यसंस्कार करण्यात…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

सुनेत्रा पवारांची तक्रार, देवेंद्र फडणवीसांनी घेतली तातडीने दखल:महापालिका रचनेत फेरबदल की राजकीय डाव? राजकारण तापलं

पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांच्या नव्या रचनेवरून राज्यातील राजकारणात नव्याने खळबळ उडाली आहे. बारामतीतील पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र पाठवून गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. महापालिकेने केलेल्या बदलांमुळे काही प्रभागांतील प्रतिनिधित्वावर परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या तक्रारीमुळे प्रशासन आणि राजकारण या दोन्ही स्तरांवर चर्चा सुरू झाली…

Read More

बिल्डरांच्या गैरव्यवहाराची चौकशी सुरू; महसूल मंत्र्यांचा कडक इशारा:एसआयटीच्या चौकशीने बिल्डर लॉबी हादरली; फौजदारी कारवाईचे आदेश

नाशिकमधील गृहनिर्माण क्षेत्रात उघड झालेल्या कथित म्हाडा घोटाळ्याने राज्यभरात खळबळ उडवली असून आता या प्रकरणात मोठी कारवाई सुरू झाली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय विशेष…

Read More

ईको कार – सिमेंट मिक्सर ट्रकची समोरासमोर धडक:कारमधील 8 जण जागीच ठार, 1 गंभीर; कल्याण – नगर महामार्गावरील भयंकर घटना

कल्याण – अहिल्यानगर महामार्गावर सोमवारी सकाळी ईको कार व सिमेंट मिक्सर ट्रकचा एक भयंकर अपघात झाला आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेत तब्बल 8 प्रवाशी ठार झाले असून, 1 जण गंभीर जखमी झाला आहे. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. तर जखमीला लगतच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती…

Read More

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी:SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा; भोंदू खरात आज कोर्टापुढे हात जोडून उभा राहिला

महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली…

Read More

अविनाश धर्माधिकारी स्थापन करणार विद्यापीठ:भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देणार

चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी भारतीय ज्ञान परंपरेला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पुणे येथे आयोजित एका नागरी सत्कार सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. विदिशा विचार मंच आणि कोहिनूर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने अविनाश धर्माधिकारी यांच्या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चाणक्य मंडल…

Read More

पंढरपूर ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट!:तरुणीनेच रचला हल्ल्याचा बनाव, पोलिसांनी रात्रीतून लावला प्रकरणाचा छडा

पंढरपूर शहरात रविवारी एका तरुणीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना घडली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रात्रभर या प्रकरणाचा सखोल तपास केला. पोलिसांनी तपास केल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. संबंधित तरुणीवर कोणताही प्रकारचा हल्ला झाला नसून, या तरुणीने स्वतःच ॲसिड हल्ल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भातील मिळालेल्या माहितीनुसार, हा…

Read More

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का?:त्यांच्यामुळेच तुम्ही राजकारणात आहात, याचा विसर पडता कामा नये- संजय राऊत

शरद पवारांच्या अस्तित्वाशिवाय बारामती आहे का? तुम्ही किती मोठे झाला असाल, अजितदादा असतील, सुनेत्रा पवार असतील, त्यांचे चिरंजीव असतील. तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद पवार यांच्यामुळे आहात. याचा विसर पडता कामा नये, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मांडले आहे. संजय राऊत म्हणाले, तुम्ही आज राजकारणात उभे आहात ते शरद…

Read More

एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा कट फसला:टीप मिळताच पोलिसांनी केले नजरकैद; शिंदेंनीही मागवला अहवाल

सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रविवारच्या धाराशिवच्या कार्यक्रमात काही लोकांनी गोंधळ घालण्याचा कट आखला होता. पण पोलिसांना कार्यक्रमापूर्वीच या कटाचा सुगावा लागला आणि त्यांनी संशयितांची धरपकड केली. आता शिंदेंनी पोलिसांकडून या घटनेचा अहवाल मागवला असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे रविवारी धाराशिवच्या दौऱ्यावर होते. ते स्थानिक पत्रकार संघाच्या कार्यक्रमालाही हजर राहणार होते….

Read More