Headlines

कल्याण-डोंबिवलीत 'केडीएमटी'ची बससेवा ठप्प:कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन, पूर्वकल्पनेविना पगारात कपात केल्याचा आरोप




कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेचे ब्रीदवाक्य ‘सेवेशी तत्पर’ असे असले तरी, आज ही सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. कंत्राटदाराने कोणतीही पूर्वकल्पना न देता पगारातून रक्कम कपात केल्याचा आरोप करत कंत्राटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी अचानक बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. या संपामुळे केडीएमटी डेपोतून एकही बस रस्त्यावर न उतरल्याने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी प्रशासनाला आक्रमक इशारा दिला असून, कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारातून कोणतीही पूर्वकल्पना न देता मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आल्याने मोठा असंतोष निर्माण झाला आहे. या अवाजवी कपातीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संबंधित पालिका अधिकारी आणि कंत्राटदाराकडे लेखी स्वरूपात स्पष्टीकरण मागितले होते. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे आणि दुर्लक्षित वृत्तीमुळे संतप्त झालेल्या सर्व कंत्राटी चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेत थेट बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. कर्मचाऱ्यांच्या या अचानक पुकारलेल्या संपामुळे केडीएमटीची बससेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, डेपोतून एकही बस बाहेर न पडल्याने सकाळपासूनच कल्याण आणि डोंबिवलीकर प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी कामगारांची पिळवणूक करणाऱ्या कंत्राटदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकण्याची जोरदार मागणी केली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या कपात केलेल्या आणि थकीत वेतनाचा प्रश्न तातडीने न सोडवल्यास पालिका अधिकारी व कंत्राटदाराला डेपोमध्ये प्रवेश करू देणार नाही, असा आक्रमक इशाराही मनसेकडून देण्यात आला आहे. आता या संपावर प्रशासन आणि कंत्राटदार नेमकी काय भूमिका घेतात व प्रवाशांची होणारी गैरसोय कधी दूर होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *