Headlines

Man Kills Wife and Son, Attempts Suicide in Jail Road



नाशिक शहरातून एक मन सुन्न करणारी अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एका पतीने आपल्याच पत्नीची आणि पोटच्या मुलाची धारदार ब्लेडसदृश शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. पत्नी आणि मुलाला संपवल्यानंतर आरोपीने

.

प्राथमिक माहितीनुसार, जेलरोड परिसरातील एका घरात हा रक्तरंजित प्रकार घडला. संशयित पतीने अत्यंत क्रूरपणे धारदार ब्लेड किंवा चाकूने आधी पत्नीवर आणि नंतर स्वतःच्या निष्पाप मुलाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा हल्ला इतका वेगाने आणि तीव्रतेने करण्यात आला की, दोघांनाही प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. शस्त्राचे खोल वार लागल्यामुळे माय-लेक रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि काही मिनिटांतच त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. कौटुंबिक कारणावरून हा भयानक प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

आरोपी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू

आपल्याच कुटुंबाचा क्रूर अंत केल्यानंतर आरोपी पतीने घरात असलेले विषारी औषध पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांच्या माध्यमातून घटनेची कुणकुण लागताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह ताब्यात घेतले, तर गंभीर अवस्थेत पडलेल्या संशयित पतीला तात्काळ नाशिकरोड येथील महापालिकेच्या ‘बिटको’ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विषारी औषधाचा अंश शरीरात गेल्यामुळे सध्या त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हत्येचे मूळ कारण अद्याप अस्पष्ट; पोलिसांकडून कसून तपास

या भयानक दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण काय होते? हा प्रकार तात्कालिक कौटुंबिक वादातून घडला की त्यामागे काही आर्थिक विवंचना किंवा मानसिक नैराश्य होते? याचा उलगडा अद्याप होऊ शकलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केला असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केले आहे. आरोपी पती शुद्धीवर आल्यानंतरच या संपूर्ण घटनेमागील मुख्य कारणाचा उलगडा होऊ शकेल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. नाशिकरोड पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

हे ही वाचा…

नांदेड हादरले:शिक्षकाची 2 मुलांसह गोदावरी नदीत कार घालत आत्महत्या, वरिष्ठांच्या मानसिक छळामुळे टोकाचा निर्णय, व्हॉट्सॲप स्टेटसवरून घटना उघड

नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत झोकून दिल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत सुनील मोरे व त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वाचा…

नांदेडचे शिक्षक सुनील मोरे आत्महत्या:कार नदीत झोकण्यापूर्वी नांदेडच्या‎ शिक्षकाने चिरला 2 मुलांचा गळा‎‎, भयंकर प्रकार उघड‎‎

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या‎करत असल्याचे स्टेटस ठेवून दोन मुलांसह ‎‎गोदावरी नदीत कार झोकून देणाऱ्या शिक्षक ‎‎सुनील मोरे यांच्या मृत्यू प्रकरणात एक‎भयानक सत्य समोर आले. मोरे यांनी‎पाण्यात उडी घेण्यापूर्वीच १३ वर्षांची मुलगी ‎‎सारा व ९ वर्षांचा मुलगा सुमीत यांची‎शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे ‎‎शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.‎दरम्यान, मोरे यांच्यावर सदोषमनुष्यवधाचा‎गुन्हा नोंदवण्यात आला आहे.‎ सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.