अमरावतीत पदपथांवर अतिक्रमण; पादचाऱ्यांना अडचण:महापालिकेच्या कारवाईनंतरही दुकानदार पुन्हा मांडतात बस्तान
अमरावती शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी असले तरी, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी पदपथांवर दुकाने थाटल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार करण्यात आले आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग विकास प्राधिकरण यांसारख्या यंत्रणांनी रस्ते बांधताना…