वडगाव खुर्द येथील आरएमसी प्लांटची खासदार कुलकर्णींकडून पाहणी:प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, तातडीने स्थलांतराची मागणी
वडगाव खुर्द परिसरातील आरएमसी प्लांट चालकांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यसभा खासदार डॉ. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी या प्लांटचे तातडीने स्थलांतर करावे, अशा सूचना महापौर आणि महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारी सिंहगड रस्त्यावरील वडगाव…