Headlines

स्वारगेटमध्ये खुनाचा प्रयत्न:वर्षभर पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी अखेर अटकेत

स्वारगेट परिसरात एका व्यक्तीवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणारा हा सराईत गुन्हेगार अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. राजसिंग युवराजसिंग जुनी (वय २८, रा. पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुनी याच्याविरुद्ध स्वारगेट…

Read More

‘प्री-वेडिंग’ टाळा आणि लग्नाच्या जेवणात 50 पदार्थ नकोत:श्री मैड क्षत्रिय सोनार समाजाचे क्रांतिकारी ठराव, दु:खद प्रसंगही साधे असावेत‎

बदलत्या काळातील उधळपट्टीला लगाम लावण्यासाठी श्री मैड क्षत्रिय सोनार समाज महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. नगर येथे संपन्न झालेल्या प्रदेश पदाधिकारी बैठकीत, लग्नसमारंभातील अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ‘प्री-वेडिंग फोटोशूट’व . पुणे येथे सात वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीनंतर नवनिर्वाचित कार्यकारिणीची ही पहिलीच महत्त्वाची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी उर्वरित पान ४ अनावश्यक खर्च टाळावा या…

Read More

खा. प्रणितींचा पालकमंत्र्यावर प्रहार, शेतकऱ्यांना धीर‎:अवकाळीने झालेल्या नुकसानीची खासदार प्रणिती शिंदे यांनी केली पाहणी, पालकमंत्री गोरे यांच्यावर सडेतोड टीका‎

. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी पंढरपूर तालुक्यातील तनाळी या गावांला भेट देत प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली. तसेच शासनाने तातडीच्या उपाययोजना करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंढरपूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी…

Read More

आदिनाथ कारखान्याचा ई-लिलाव; एनसीडीसीकडून 22 मे रोजी प्रक्रिया:कारखान्याकडे एनसीडीसीचे 85 कोटी 12 लाख 75 हजार 464 रुपये कर्ज थकीत

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याबाबत मोठी घडामोड समोर आली असून, राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडून ‘सरफेसी’ कायद्याअंतर्गत ई-लिलावाची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. कारखान्याचे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून दि. २२ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत ई-लिलाव प्रक्रिया होणार असल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. प्रसिद्ध झालेल्या…

Read More

मोहोळ येथे सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेला गुरुवारपासून होणार प्रारंभ:रविवार दि.26एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याच्या कार्यक्रमाने होणार सांगता‎

मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस गुरुवार दि.१६ एप्रिल रोजी सकाळी श्री गवई स्वामी अभिषेक व रात्री श्री गवई स्वामींची पालखीतून सवाद्य मिरवणूक व श्रींची भेट व प्रसाद सुरुवात होणार आहे.तर रविवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी श्रींचे तेल उतरवण्याचा कार्यक्रम व प्रसादाने सांगता होणार आहे. मोहोळ ग्रामस्थांचे ग्रामदैवत सद्गुरु नागनाथ देवाच्या यात्रेस दि. १६…

Read More

जिल्हा सह. बँक अध्यक्षपदी डॉ. कोरपे, उपाध्यक्षपदी ठाकरे

अकोला- वाशीम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जयराज संतोषकुमार कोरपे तर उपाध्यक्षपदासाठी रामेश्वर सुभाषराव ठाकरे यांचे एक- एकच अर्ज आले. त्यामुळे अध्यासी अधिकारी गितेशचंद्र साबळे यांनी अध्यक्षपदी डॉ. जयराज कोरपे तर उपाध्यक्षपदी रामेश्वर ठाकरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संतोषकुमार कोरपे यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलने जिल्हा बँकेची सत्ता राखत पुन्हा वर्चस्व सिद्ध केले…

Read More

शैक्षणिक सहलीतून ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनुभव:किड्झी प्री स्कूलतर्फे आयोजन; भाजी, फळ बाजार, गोशाळा, पोलिस ठाण्यात भेट‎

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष जीवनाशी जोडणारे शिक्षण देण्याच्या उद्देशाने येथील किडझी प्री स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेली वार्षिक शैक्षणिक सहल उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना ‘प्रत्यक्ष शिक्षणा’चा अनोखा आणि समृद्ध अनुभव घेता आला. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना शहरातील भाजी बाजार, फळ बाजार, गोशाळा तसेच पोलिस ठाण्याला भेट देण्यात…

Read More

बार्शीटाकळी येथे नागरी वस्तीमधून 800 लिटर अवैध डिझेल साठा जप्त:राज्य अन्न आयोग सदस्या व पुरवठा विभागाचा छापा‎

शहरातील इंदिरा आवास भागात गुरुवारी प्रशासनाने एक मोठी कारवाई करत नागरी वस्तीत साठवलेले सुमारे ८०० लिटर अवैध डिझेल जप्त केले आहे. राज्य अन्न आयोगाच्या सदस्य आणि तालुका पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा छापा टाकला. दाट लोकवस्ती असलेल्या भागात अशा अत्यंत ज्वलनशील पदार्थाचा साठा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गु्प्त माहितीवरून प्रशासनाने ही कारवाई केली. मिळालेल्या…

Read More

भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा:यासाठी एक पोर्टलही विकसित करावे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. देवेंद्र…

Read More

भारताची 65 टक्के लोकसंख्या 27 वर्षांखालील:शिक्षण, कौशल्य विकासच भविष्याची गुरुकिल्ली: कौस्तुभ धवसे

भारताची 65 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या 27 वर्षांखालील आहे. या निर्णायक टप्प्यावर शिक्षण, कौशल्य विकास आणि योग्य धोरणे भारताच्या आर्थिक व जागतिक भविष्याला दिशा देतील, असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक आणि धोरण विभागाचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे यांनी म्हटले आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याच्या उद्दिष्टाचा उल्लेख करत, आज घेतलेले निर्णय भविष्यातील सक्षम मनुष्यबळ घडवण्यासाठी…

Read More