Headlines

सिलिंडर मिळण्याआधी डिलिव्हरीचा संदेश:गॅस एजन्सींचा अजब कारभार, साठा दुप्पट तरीही तुटवडा का? विभागाची आकडेवारी कागदावरच‎

अमेरिका आणि इस्रायलने इराणशी पुकारलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरापासून सुरू झालेला घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा अजूनही अमरावतीकरांची पाठ सोडायला तयार नाही. ग्राहकांना आजही रांगेत उभे राहूनच सिलिंडरची प्रतीक्षा करावी लागत आहे. . कमी-अधिक प्रमाणात भारत, इन्डेन आणि एचपी या तिन्ही प्रकारच्या गॅस वितरकांच्या कार्यालयांसमोरचे हे चित्र आहे. संबंधित प्रतिनिधीने आज, गुरुवारी, सकाळच्या सत्रात काही वितरकांच्या…

Read More

प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरून आदित्य ठाकरेंवर नाराज:ते कधी ना कधी आमच्याकडे येतीलच, मंत्री प्रतापराव जाधव यांचा दावा

महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू होतील असेही बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचा दावाही केला गेला. मात्र हा दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आता शिंदेगटाच्या मंत्र्यांनी मोठा…

Read More

बारामतीत 23 उमेदवार रिंगणात:काँग्रेसच्या माघारीनंतर लढत एकतर्फी? 30 जणांनी घेतली माघार; आता कोण टक्कर देणार, वाचा नावे

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता एकूण 23 उमेदवार रिंगणात उरले असून, या निवडणुकीचं चित्र पूर्णपणे बदलल्याचं दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 30 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे निवडणूक सरळ झाली आहे. विशेष म्हणजे या 23 उमेदवारांपैकी केवळ 10 उमेदवार बारामती मतदारसंघातील आहेत, तर उर्वरित 13 उमेदवार बाहेरील भागातील आहेत. सोलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण आणि…

Read More

औंढा नागनाथ येथे १२ हजार पेपर पुन्हा मिळाले:मूल्यमापन चाचणीचा मार्ग मोकळा, शिक्षणाधिकारी असावरी काळे यांचा पाठपुरावा

औंढा नागनाथ पंचायत समितीच्या गटसाधन केंद्रातील संकलित मूल्यमापन चाचणीच्या प्रश्नपत्रिकांना आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शिक्षण अधिकारी असावरी काळे यांनी तातडीने प्रशिक्षण परिषद पुणे यांच्याशी संपर्क साधून तातडीने पेपर उपलब्ध करून घेतले. या पेपरचे शुक्रवारी तारीख 10 केंद्रामध्ये वाटप करण्यात आले आहे औंढा नागनाथ येथील पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राला बुधवारी तारीख 9 आग…

Read More

ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही:सगळे खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी एकजुटीने उभे, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा असून लवकरच मोठे पक्षांतर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऑपरेशन टायगर सुरू असल्याच्या चर्चा देखील सुरू आहेत. यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अनिल देशमुख म्हणाले, असे आहे की या सर्व बातम्या…

Read More

शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट

नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना…

Read More

रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस:पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी नोटीस; 2 कोटी 40 लाखांचा द्यावा लागणार हिशोब

शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यामुळे पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या चौकशीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी…

Read More

जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले:अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन काढला काटा, तिघांना अटक

सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील तरुणाच्या खूनाचे गुढ उकलले असून लोणार तालुक्यातील वढव येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुण मुलाचा त्याच्या आईनेच प्रियकराच्या मदतीने २५ हजार रुपयांमध्ये सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना शुक्रवारी ता. १० अटक केली आहे. सेनगाव तालुक्यातील जामदया शिवारातील नाल्यात दोन…

Read More

बालकांच्या असंसर्गजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष पुढाकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बालकांमधील असंसर्गजन्य आजारांवर (एनसीडी) प्रभावी नियंत्रणासाठी नागपूर येथील एम्स, बालरोग विभागासोबत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. कराराच्या माध्यमातून बालकांसाठी अधिक सुरक्षित, निरोगी आणि समर्थ वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने ठोस पाऊल टाकले आहे. या सामंजस्य कराराबाबत मुख्यमंत्री…

Read More

ऑपरेशन टायगर किती खरे – किती खोटे:ठाण्यातील व्होल्टास कंपनी परिसरात बुधवारी पहाटेपर्यंत बैठक; खासदारांच्या ताबडतोब प्रतिक्रिया

राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दिल्लीतील नेतृत्वाकडून यासाठी एकनाथ शिंदे यांना हिरवा कंदील मिळालेला नसल्याची चर्चा असली तरी, पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे अजूनही गुप्तपणे ठाकरे गटाच्या खासदारांशी संपर्क साधत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाण्यात झालेल्या कथित बैठकीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या…

Read More