Headlines

CM Devendra Fadnavis On Dharmendra Pradhan Resignation| CJP Protest


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. “धर्मेंद्र प्रधानांनी व्यापक जनहिताप्रती वचनबद्धता दर्शवत राजीनामा दिला. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठ

.

नीट पेपरफुटी प्रकरणी धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ गेल्या ३६ दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत होते. आज दुपारी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या राजीनाम्याची माहिती दिली. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचे निर्णयाचे कौतुक केले. तसेच प्रधान यांच्या कार्यकाळातील विविध महत्त्वाच्या कामगिरीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, “धर्मेंद्र प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पीएम श्री शाळांची स्थापना, परदेशात आयआयटींचा विस्तार आणि प्रवेश परीक्षांचा १९ भाषांपर्यंत विस्तार यांसारख्या अनेक सुधारणांचे त्यांनी नेतृत्व केले.

भाजप धर्मेंद्र प्रधानांच्या पाठिशी

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भाजप परिवार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “व्यापक जनहिताप्रती आपली वचनबद्धता दर्शवत, त्यांनी आज आपला राजीनामा सादर केला. त्यांनी वैयक्तिक स्वार्थापेक्षा राष्ट्रीय हिताला प्राधान्य दिले, जे एका खऱ्या भाजप कार्यकर्त्याचे वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भाजप परिवार त्यांच्या पाठीशी उभा आहे.”

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीत

दरम्यान, धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडताच देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्लीला गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यावर बोलताना ‘फडणवीस केंद्रात शिक्षणमंत्री होऊ शकतात’ असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. फडणवीस यांनी आज दिल्लील भाजपच्या जेष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ते सायंकाळी पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत कोणत्या नेत्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत काय चर्चा झाली? याबाबतची माहिती समजू शकली नाही.

धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा देताना काय म्हटले?

धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा व्यक्त करणारे एक पत्र प्रसिद्ध केले. दोन पानांच्या, ५७५ शब्दांच्या या पत्रात, प्रधान यांनी इतर गोष्टींबरोबरच, दोन ठिकाणी तरुणांची दिशाभूल केल्याचा उल्लेखही केला आहे. पत्राचा हा भाग खाली ठळकपणे दिला आहे.

हे ही वाचा…

22 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल शब्द नाही:पोलिसांच्या अत्याचारावर मौन, नुकसानभरपाईचे काय? प्रधानांच्या राजीनाम्यावर आंबेडकरांची टीका

‘नीट’ परीक्षेतील गोंधळ, पेपरफुटी आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर पेटलेल्या विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर केंद्र सरकारला झुकावे लागले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला असून, त्यांनी आपले राजीनामा पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवले आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी या निर्णयाची घोषणा करत राजीनाम्यामागील भूमिका मांडली. दरम्यान, या राजीनाम्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत, “प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले असून, कधीही न झुकणाऱ्यांना आता जनतेसमोर नाक रगडावे लागले आहे,” असा घणाघाती टोला लगावला आहे. सविस्तर वाचा…

‘जेनझी’ने सरकारच्या झिंज्या उपटल्या:उद्याचा तिरंगा मार्च होणारच, शिवाजी पार्कवर तरुणांचा विजयोत्सव साजरा करू – ठाकरे बंधू

‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर आणि गृहखात्यावर घणाघाती हल्ला चढवला. “हा देशभरातील तरुणाईचा आणि ‘जेनझी’चा ऐतिहासिक विजय असून, त्यांनी मस्तवाल सरकारच्या झिंज्या उपटून त्यांना जमिनीवर आणले आहे,” असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. तर, “पोलिसांच्या अत्याचारावर कारवाई झाली नाही, तर आता तरुणाईचा मोर्चा गृहमंत्री अमित शहांकडे वळल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.