नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनाचा लोकशाही मार्गाने हक्क असल्याचे मान्य करतानाच सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, असे आवाहन त्यां
.
सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये दीपाली सय्यद म्हणाल्या की, “नीट पेपरप्रकरणी देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. हा त्यांचा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. भारतात व्यक्तिस्वातंत्र्य आहे, मात्र त्या स्वातंत्र्याचा वापर जबाबदारीने झाला पाहिजे.”
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध
दीपाली सय्यद यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. “ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर मारहाण झाली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्याचा मी मनापासून निषेध करते,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मात्र, त्याचवेळी त्यांनी आंदोलनादरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ नये, असेही आवाहन केले. “व्यक्तिस्वातंत्र्याचा वापर करताना आपण आपल्या देशाच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर करत नाही ना, याचाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
‘आंदोलनाला भडकावण्याचा प्रयत्न होत आहे का?’
या आंदोलनामागे काही राजकीय शक्ती विद्यार्थ्यांना भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“विरोधक या आंदोलनाला भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत का? बांग्लादेश आणि नेपाळमध्ये ज्या पद्धतीने आंदोलन भडकले, तशाच प्रकारचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, याचाही विचार होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी म्हटले.
‘या सरकारमध्ये प्रभू श्रीरामांचे सैनिक आहेत’
सरकारबद्दल विश्वास व्यक्त करताना दिपाली सय्यद म्हणाल्या, “हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारमध्ये प्रभू श्रीरामांचे सैनिक आहेत, हे आपण विसरता कामा नये.”
त्यांनी पुढे सांगितले की, “भारतीय संस्कृती ही मोठ्यांचा आदर करणारी आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यामुळे कुठल्याही भडकावू विधानांना बळी पडू नका. मला विश्वास आहे की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेईल आणि त्यांना योग्य न्याय मिळेल.”
दरम्यान, दीपाली सय्यद यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे, तर काहींनी त्यांच्या विधानांवर टीकाही केली आहे.
हेही वाचा…
आवाज दाबून नव्हे, ऐकून राष्ट्र घडतं:हातात भारताचे संविधान घेऊन वनिता-प्रियदर्शनीचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग, प्राजक्ता माळीनेही केली पोस्ट

नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता मराठी कलाविश्वातूनही पाठिंबा मिळू लागला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरात आणि प्रियदर्शनी इंदलकर यांनी मुंबईतील दादर येथील आंदोलनात सहभागी होत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आंदोलनातील फोटो वनिता खरात यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी