Headlines

Father Kills Daughter Over Inter-Caste Marriage; Arrested



कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरात एका विवाहित तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करून फरार झालेल्या नराधम वडिलांना बाजारपेठ पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. केवळ मुलीने आपल्या मनाविरुद्ध आणि कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद वसईकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, गायत्री असे मृत मुलीचे नाव आहे. गायत्रीने काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबाचा विरोध झुगारून इतर जातीतील एका तरुणाशी प्रेमविवाह केला होता. विशेष म्हणजे, वडिलांनी गायत्रीसाठी दोन वेळा मोठ्या थाटात साखरपुड्याची तयारी केली होती, मात्र तिने दोन्ही स्थळे नाकारल्यामुळे विनोद वसईकर हा प्रचंड संतापलेला होता आणि त्याच्या मनात सुडाची भावना होती.

माहेरी आली अन् घात झाला!

गायत्री प्रियकराशी लग्न केल्यानंतर काही दिवसांनी काही वैयक्तिक कामासाठी रचना रॉयल इमारतीमधील आपल्या माहेरी आली होती. घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलीमध्ये लग्नाच्या जुन्या विषयावरून पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात विनोदने घरातील धारदार शस्त्राने गायत्रीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गायत्री रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

अखेर तीन दिवसांनी नराधम बाप अटकेत

आपल्याच सख्ख्या मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी विनोद वसईकर घटनास्थळावरून पसार झाला होता. बाजारपेठ पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली होती. अखेर तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत तीन दिवसांनी पोलिसांनी विनोद वसईकरला बेड्या ठोकल्या.

पोलिसांसमोर दिली कबुली

बाजारपेठ पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीदरम्यान आरोपीने आपला गुन्हा मान्य केला आहे. मुलीने आंतरजातीय विवाह करून कुटुंबाची बदनामी केल्याच्या रागातूनच आपण तिचं आयुष्य संपवल्याची कबुली त्याने दिली. या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत.

हे ही वाचा…

हत्या झालेली तरुणी जिवंत घरी परतली:बाप अन् भावाने अंगावर घेतला होता हत्येचा गुन्हा; बुलढाणा जिल्ह्यातील विचित्र घटना

बाप व भावाने हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मृत मानलेली तरुणी अचानक जिवंत घरी परतल्याची विचित्र घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात घडली आहे. या प्रकरणी मृत तरुणी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्याने तिच्या वडील व भावाने हत्येची कबुली का दिली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.