गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणात केवळ शाळा व्यवस्थापन
.
आश्रमशाळा नसून एखादा कोंडवाडाच असल्याची टीका
घटनेनंतर आश्रमशाळेला भेट देऊन पाहणी केल्यानंतर दानवे यांनी तेथील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे सांगितले. ही आश्रमशाळा नसून एखादा कोंडवाडाच असल्याची टीका त्यांनी केली. अवघ्या सुमारे ९०० चौरस फुटांच्या हॉलमध्ये १११ मुली आणि सुमारे १००० चौरस फुटांच्या जागेत ११२ मुलांना राहावे लागत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या- दानवे
हॉस्टेलच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लाकडाचा साठा असल्याने त्याच ठिकाणाहून साप आल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसाठी कॉट, मच्छरदाणी यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच एवढ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ सहा स्नानगृहे आणि चार शौचालयांची व्यवस्था असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार सुविधा देण्याची मागणी
दानवे यांनी सांगितले की, आश्रमशाळेत एकूण २२६ निवासी विद्यार्थी शिक्षण घेत होते. सर्पदंशाच्या घटनेनंतर अनेक पालकांनी आपल्या मुलांना घरी नेले आहे. या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्याचा निर्णय हा योग्य उपाय नसून, विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून शाळा सुरू ठेवावी, अशी पालकांची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुदान नेमके कुठे खर्च होते?
आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देते. मात्र, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना आवश्यक मूलभूत सुविधाच मिळत नसतील, तर हे अनुदान नेमके कुठे खर्च होते, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला. शाळा व्यवस्थापनाबरोबरच आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही नियमित पाहणी करून जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि या प्रकरणात त्यांनाही जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा..
मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी फुगवण्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांचा वापर:भाजपच्या ‘तिरंगा यात्रे’वरून अंबादास दानवेंचा जोरदार हल्लाबोल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘तिरंगा यात्रे’वरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी दाखवण्यासाठी आणि ‘उधारीचे दंड फुगवण्यासाठी’ चक्क इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या यादीचा पुरावाच शेअर केल्याने भाजपच्या या शक्तिप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा