Headlines

Japanese children study village tourism in Indian villages; Production and sale in villages also strengthens the local economy


  • Marathi News
  • National
  • Australia Japanese Children Study Village Tourism In Indian Villages; Production And Sale In Villages Also Strengthens The Local Economy

वैष्णवी सोमाणी31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचे पथक. - Divya Marathi

ऑस्ट्रेलियाच्या न्यू कॅसल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचे पथक.

टोटो ही जगातील सर्वात छोटी जमात आहे. पश्चिम बंगालच्या टोटोपारा गावात जमातीचे शेवटचे १७०० लोक राहतात. गाव अस्तित्त्वासाठी संघर्ष करत होते. एकमेव शाळेत एका अतिरिक्त खोलीची गरज होती. खाद्यसंस्कृतीासाठी महिलांना कॅफे उघडायचा होता. टोटोपारापासून २५०० किलोमीटर दूर बेंगळुरूच्या क्राइस्ट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांचे १४ सदस्यीय पथक गेल्या वर्षी या गाव भेटीवर आले. १० दिवसांच्या टूरमध्ये विद्यार्थ्यांनी महिलांसोबत मिळून कॅफेचे प्राइसिंग मॉडेल-मेनू बनवले. या दौऱ्याने गावास ६ लाखांची कमाई झाली. शाळेची खोली बांधली. कॅफे उघडला. ‘लोकल नॅरेटिव्हज’ने ग्राम पर्यटनाला मनोरंजनापुरते न ठेवता, लर्निंगशी जोडले.

जपान-ऑस्ट्रेलियाच्या १० संस्था जोडल्या

ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी ऑफ न्यू कॅसल, क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी,जपानमध्ये टोकियो- नागोयाच्या ८ शाळांचे मुले हे शिकण्यासाठी भारतात येत आहेत.

भारताची ५० गावे यजमानपदासाठी तयार

वैष्णवी म्हणाले,लोकल नॅरेटिव्हजची सुरुवात २०२१ मध्ये झाली. पर्यटनाचा उद्देश स्थानिकांसारखे गावात राहून जनजीवन समजून घेणे, शिकणे हा आहे. यात ५० गावांना यजमानपदासाठी तयार केले. याचा गावांनाही फायदा होत आहे. उत्तराखंडच्या सुनकियामध्ये विद्यार्थ्यांच्या दौऱ्यानंतर देशातील पहिली कम्युनिटी टुरिझम प्लेबुक तयार झाली. दुसऱ्या दौऱ्यात गोव्याच्या असनोरामध्ये विणकर महिलांना खरेदीदारांशी जोडले, यामुळे त्यांची कमाई वाढली.

IIM बेंगळुरूने याला क्रेडिट प्रोग्राम म्हणून मान्यता दिली

वैष्णवी म्हणाले, आम्ही पर्यटनाला लर्निंगशी जोडले. यासाठी ५ दिवसांचा अभ्यासक्रम बनवला. यात लोकल नॅरेटिव्हज को-फॅकल्टी होते. आयआयएम बेंगळुरूने या कोर्सला मान्यता दिली. गावांत सामाजिक उद्योजकता शिकल्याने विद्यार्थ्यांना ३ क्रेडिट म्हणजे गुणही मिळत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *