![]()
राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून, लाभार्
.
फेब्रुवारी महिन्यानंतर मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा हप्ता तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. मे महिना उजाडल्यानंतरही खात्यात पैसे जमा न झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थी महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. सरकार दोन्ही महिन्यांची थकबाकी एकाच वेळी देईल, असा मोठा दावा काही दिवसांपासून केला जात होता. मात्र, आज अनेक महिलांच्या मोबाईलवर 1500 रुपये जमा झाल्याचे संदेश धडकल्याने महिलांमध्ये आनंदासह काहीसा भ्रमनिरासही पाहायला मिळत आहे.
मार्च आणि एप्रिल अशा दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये थेट खात्यात येतील, अशी लाभार्थी महिलांना खात्री होती. प्रत्यक्षात मात्र सरकारने एकाच महिन्याचा हप्ता वर्ग केला आहे. उर्वरित 1500 रुपये येत्या काही दिवसांत जमा होणार की त्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. प्रशासनाने महिलांना आपले बँक खाते तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.
अपात्र लाभार्थींवर टाच, यादीत मोठी कपात
या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत. नियमांचे उल्लंघन करून किंवा चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची नावे शोधून ती यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे लाभार्थी महिलांच्या संख्येत घट झाली असून, केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, याची खबरदारी घेतली जात आहे.
‘केवायसी’साठी दिली होती मुदतवाढ
योजनेचा लाभ निरंतर सुरू राहण्यासाठी सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ‘केवायसी’ (KYC) पूर्ण करण्याची सूचना केली होती. सुरुवातीला यासाठी 31 मार्च 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण असल्याने ही मुदत 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली होती. ज्या महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली आहे, त्यांच्याच खात्यात आता पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे.