Headlines

स्मशानभूमीअभावी नदीच्या पुलाखाली अंत्यसंस्कार:कन्नड तालुक्यातील वैसपूरची घटना, गतवर्षीच्या अतिवृष्टीत वाहून गेली होती स्मशानभूमी‎




शिवना टाकळी प्रकल्पात पुनर्वसित वैसपूर गावची स्मशानभूमी गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेली होती. या घटनेला वर्ष उलटूनही प्रशासनाने नवी स्मशानभूमी दिली नाही. अखेर रविवारी गावातील भाऊराव बारकू बोर्डे यांच्या निधनानंतर अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण झाला. जागाच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांनी चक्क देवगाव रंगारी ते चापानेर रस्त्यावरील शिवना नदीच्या पुलाखाली अंत्यविधी उरकला. जिल्हा परिषद सदस्य डॉ. संजय गव्हाणे म्हणाले, वैसपूरची स्मशानभूमी वाहून गेल्याने ग्रामस्थ एक वर्षापासून तहसील कार्यालय, महसूल विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, या जबाबदार अधिकाऱ्यांना नागरिकांच्या या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. भाऊराव बोर्डे यांच्या निधनानंतर अंत्यविधी कुठे करायचा, असा प्रश्न कुटुंबीय आणि ग्रामस्थांसमोर होता. प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिवना नदीच्या पुलाखाली भाऊराव यांना भडाग्नी दिला. या प्रसंगी ज्ञानेश्वर बोर्डे, मेघराज गिरी, केशव बोर्डे, विलास बोर्डे, सुदाम बोर्डे, रामहरी बोर्डे, समाधान बोर्डे, प्रकाश शेळके, राजेंद्र बोर्डे, किशोर बोर्डे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. पुढचा अंत्यविधी आता थेट तहसील कार्यालयामध्ये नागरिकांमध्ये संताप असून, तहसील कार्यालय, गटविकास अधिकाऱ्यांनी वैसपूरला स्मशानभूमीसाठी जागा आणि निधी मंजूर केला नाही, तर यापुढील गावातील अंत्यविधी तहसीलच्या आवारात करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. वैसपूरच्या स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने सोडवणार तहसीलदार पदाचा नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे वैसपूर स्मशानभूमी प्रश्न सोडविण्यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. – सारिका भगत, तहसीलदार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *