![]()
वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट-युजी’ (NEET-UG) परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे रद्द झाल्याचा मोठा धक्का देशातील विद्यार्थ्यांना बसला आहे. या निर्णयामुळे निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील एका १८ वर्षीय विद्य
.
मैथिलीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले
अत्यंत गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीतून पुढे आलेल्या मैथिली सोनवणे हिने नीट परीक्षेसाठी अहोरात्र कष्ट केले होते. ३ मे रोजी झालेली तिची मुख्य परीक्षा अत्यंत उत्तम गेली होती आणि आपल्याला चांगल्या गुणांसह सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असा तिला पूर्ण विश्वास होता. मात्र, देशभरात गाजलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणामुळे निर्माण झालेला संभ्रम आणि ऐनवेळी परीक्षा रद्द करण्याचा झालेला निर्णय यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड नैराश्यात होती.
३ मेची परीक्षा रद्द करून ती २१ जून रोजी पुन्हा घेण्याची घोषणा प्रशासनाने केली होती. मात्र, कमी कालावधीत पुन्हा होणारी फेरपरीक्षा, त्याची संभाव्य काठिण्य पातळी आणि वाढता मानसिक दबाव मैथिलीला सहन झाला नाही. पेपरफुटीच्या गोंधळामुळे आणि फेरपरीक्षेच्या तणावामुळेच आपल्या मुलीने हे टोकाचे पाऊल उचलले, असे मैथिलीच्या ५० वर्षीय शेतकरी वडिलांनी सांगितले. या प्रकरणी गातेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
१२ दिवसांत देशात नीट पेपरफुटीचे ६ बळी
नीट परीक्षा रद्द झाल्याने आणि वर्षानुवर्षांची मेहनत पाण्यात गेल्याच्या भावनेतून देशाच्या विविध भागांतून १२ दिवसांत ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्येही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून मृत्यूला कवटाळले आहे.
प्रदीप मेघवाल (२२, राजस्थान): सीकर येथे त्याने आत्महत्या केली. गेल्या तीन वर्षांपासून तो कोटा आणि सीकरमध्ये तयारी करत होता. यंदा त्याला चांगले गुण मिळण्याची खात्री होती.
रितिक मिश्रा (२१, उत्तर प्रदेश): लखीमपूर खेरी येथील या विद्यार्थ्याचा हा ‘नीट’चा तिसरा प्रयत्न होता. कठोर परिश्रमानंतर दिलेली परीक्षा रद्द झाल्याचा धक्का तो सहन करू शकला नाही.
अंशिका पांडे (२०, दिल्ली): आझादपूर परिसरातील या विद्यार्थिनीने परीक्षेचे भवितव्य अंधारात असल्याचे पाहून नैराश्यातून जीवन संपवले.
१७ वर्षीय परीक्षार्थी (गोवा): दक्षिण गोव्यातील मडगाव येथे एका अल्पवयीन विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून घेतला.
१७ वर्षीय परीक्षार्थी (कर्नाटक): कर्नाटकातील एका विद्यार्थिनीनेही परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे आलेल्या प्रचंड मानसिक दबावापोटी आत्महत्या केली.
पालक आणि तज्ज्ञांमध्ये चिंतेचे वातावरण
मुलांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मैथिलीने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे लातूरमधील शैक्षणिक वर्तुळात या घटनेमुळे तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांनी खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन तज्ज्ञांकडून केले जात आहे.