Headlines

Maharashtra BJP Slams Raut, Udhav Thackerays Giddh Pravrutti


संजय राऊत हे सकाळपासून गांजा ओढून नशेच्या अवस्थेत पत्रकार परिषद घेत असतात. तुम्ही सावध असण्याचा प्रश्नच नाही. तुमचा पक्ष सुद्धा कायम बेसावध असतो. तुम्ही सावध असता तर तुमच्या नाकाखालून 40 आमदार निघून गेले नसते, पक्षाची ही अवस्था झाली नसती. हिंदुत्व सो

.

नवनाथ बन म्हणाले की, राज ठाकरे यांचा पक्ष फोडून त्यांचे सहा नगरसेवक तुम्ही फोडले होते त्यावेळी कोण देहविक्रीसाठी बसले होते हे राज ठाकरे आणि संजय राऊत यांनी सांगावे. ठाकरे मुंबई मनपात सत्तेत असताना त्यांनी भावाचा पक्ष फोडण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही. तेव्हा नेमके कोण देहविक्री करत होते, तेव्हा कोणी बाजार मांडला होता. भाजपा पत्याचा बंगला नाही तर मजबूत राष्ट्रीय विचारधारेवर उभा असलेला किल्ला आहे, असे म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला बन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्याचे बंगले कसे असतात हे मनसेकडे बघितल्यावर कळते.

100 जन्म घेतले तरी ऑपरेशन कमळ करू शकत नाही

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत भाजपचे ऑपरेशन कमळ होईल असे भाकित व्यक्त करत आहेत. राऊत किंवा त्यांच्या पक्षाने 100 जन्म घेतले तरी भाजपचा साधा कार्यकर्ता दूर करू शकत नाही. आम्ही राष्ट्रप्रथम म्हणून काम करत असतो. तुमच्यासारखे आम्ही स्वार्थाचे राजकारण करत नाही. अडीच वर्षांमध्ये मविआचे सरकार होते त्यावेळी राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार आणि कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करत त्यांच्यावर दबाव आणाण्याचा प्रयत्न केला पण लोकप्रतिनिधी तर सोडा कार्यकर्ताही फोडता आला नाही.

राऊत केवळ गाढवांचे नेतृत्व करू शकतात

नवनाथ बन म्हणाले की, राऊतांनी इतरांना लांडगे-कोल्हे म्हणण्यापेक्षा आपण भांडूपच्या गाढव नाक्याचे नेतृत्व करतोय हे लक्षात ठेवा. त्या नाक्यावर उभे राहुन तुम्ही जी बडबड करता त्यामुळे तुम्हाला गाढव नाक्याचे नेतृत्व शोभून दिसते. तुमची गिधाडी प्रवृत्ती महाराष्ट्राने पाहिली आहे. तुम्ही कोरोना काळात लोकांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम केले आहे. तुम्हाला ऑपरेशन गिधाड शोभते, बाकी तुम्ही काही बोलत जाऊ नका. तुम्ही गाढवाचे नेतृत्व करू शकता एवढीच तुमची पात्रता आहे.

हे ही वृत्त वाचा

भविष्यात मोदी-शहा एकमेकांनाच फोडतील:महायुती म्हणजे रामद्रोही अन् धर्मद्रोह्यांचा अड्डा, राज ठाकरेंचे म्हणणे योग्यच, हा तर देहविक्रीचा प्रकार- राऊत

राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणाचे सत्य सांगितले आहे. हा सर्व देहविक्रीचाच प्रकार आहे. उद्या शिंदे गटातील लोकं दुसरीकडे जायला कमी करणार नाहीत. तुम्हाला मुलांसारखे सांभाळले आणि तुम्ही लफडे करत तिकडे गेलात, असे म्हणत उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी फुटलेल्या खासदारांना टोला लगावला आहे. अहिर यांच्यावर उद्धव ठाकरेंनी विश्वास ठेवला तो गेल्यावर ठाकरेंना काय वाटले असेल. आता एक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा एकमेकांना फोडण्याचे काम करतील. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *