Headlines

पुण्यात लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, 12 लाखांचा ऐवज चोरीला:विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपास सुरू




पुण्यातील नवी पेठेतील लोकमान्यनगर येथे एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी 11 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 30 जून रोजी मध्यरात्री घडली असून, 1 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि त्यांचे कुटुंबीय लोकमान्यनगरमधील इमारत क्रमांक नऊमध्ये राहतात. चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून शयनगृहातील कपाट उचकटले आणि त्यातील दागिने लंपास केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी लोकमान्यनगर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. या घरफोडीमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक क्षीरसागर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, अप्पा बळवंत चौकातील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएम केंद्रातही चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 1 जुलै रोजी पहाटे चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करून तोडफोड केली आणि रोकड चोरण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणीही विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस हवालदार खरात या घटनेचा तपास करत आहेत. कपड्याच्या दुकानाची खिडकी तोडून एक लाख 70 हजारांची रोकड पळवली कॅम्प परिसरातील एका कपड्याच्या दुकानाच्या पहिल्या मजल्याची खिडकी उचकटून आणि लोखंडी ग्रील काढून आत शिरलेल्या चोरट्यांनी काउंटरमधील रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी अभिषेक राम कुमार आणि सचिन प्रताप परिहार (वय 20, रा. फ्लॅट नंबर 102, बिबवेवाडी, वट्टा यण्णा डोसा समोर, बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रणबीर मोहन कडारा (वय 27, रा. गुलटेकडी खिलारे वस्ती, लक्ष्मी माता मंदिराजवळ, गुलटेकडी मार्केटयार्ड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 30 जून रोजी पहाटे दोन वाजून चाळीस मिनिटांनी कॅम्पमधील एम. जी. रोडवरील ‘इंटरस्टाईल मेन्स अँड किड्स शॉप’मध्ये ही घरफोडी झाली. आरोपींनी दुकानाच्या वरच्या मजल्यावरील मागील खिडकी उचकटून लोखंडी ग्रील काढली आणि आत प्रवेश केला. त्यांनी कॅश काउंटर उचकटून त्यामधील एक लाख 70 हजार रुपये रोख चोरून नेले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *