Headlines

Mumbai Rains Update: Heavy Rainfall Alert In Konkan & Ghats


गेले काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर, महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगाल

.

मुंबईत मुसळधार, पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा

मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये आज (गुरुवार, 13 ऑगस्ट) सकाळपासूनच मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर आणि विलेपार्ले या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. विशेषतः गोरेगाव, मालाड आणि कांदिवलीत पावसाचा जोर अधिक आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम द्रुतगती महामार्गाला (WEH) बसला आहे. बोरीवलीहून वांद्रेकडे जाणाऱ्या साऊथ बाउंड मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी आणि विलेपार्ले परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना या वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मालाड ते विलेपार्ले हा अर्ध्या तासाचा प्रवास करण्यासाठी वाहनचालकांना तब्बल दीड तास लागत आहे. गोरेगाव आरे कॉलनी ते मरोळ नाका व पवईकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही ट्रॅफिक जॅम आहे. वाहतूक पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

हवामान विभागाचा (IMD) अलर्ट: कुठे पडणार पाऊस?

13, 14 आणि 15 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अलर्ट (१४ ऑगस्ट): चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

इतर जिल्हे: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. घाट परिसरात दरडी कोसळण्याची आणि भूस्खलनाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवसांचा अंदाज

दिनांक पावसाची स्थिती
13 ऑगस्ट कोकणात मुसळधार; मध्य महाराष्ट्र व विदर्भातही पावसाची शक्यता
14 ऑगस्ट कोकणात मुसळधार; मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार; विदर्भात मुसळधार
15 ऑगस्ट कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पाऊस
16 ऑगस्ट मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस; कोकणातील जोर कमी होण्याची शक्यता
17 ऑगस्ट विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

विदर्भात पावसाचा खंड: खरिपाची पिके धोक्यात!

राज्यात पावसाचा जोर वाढत असला तरी, विदर्भात गेल्या १२ दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने ‘बॅकलॉग’ वाढला आहे. सध्या खरिपाच्या पिकांच्या वाढीचा काळ आहे आणि त्यांना पाण्याची अत्यंत गरज आहे. जुलैच्या शेवटी झालेल्या पावसाने दिलासा दिला होता, पण ऑगस्टमध्ये मान्सून गायब झाल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले आहेत. 1 जून ते 12 ऑगस्ट या काळात नागपूर जिल्ह्यात 483 मिमी पाऊस पडला असून, सरासरीच्या तुलनेत तब्बल 21 टक्क्यांची तूट आहे. संपूर्ण विदर्भाची पावसाची तूट 13 टक्क्यांवर पोहोचली आहे.

जिल्हानिहाय परिस्थिती

अमरावतीमध्ये सर्वाधिक 26% तूट आहे. तर चंद्रपूर (22%), अकोला (20%), गडचिरोली (18%) आणि वाशीम (10%) येथेही पाऊस कमी झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, फक्त बुलढाणा आणि गोंदिया जिल्ह्यात सरासरीपेक्षा 10 टक्के अधिक पाऊस झाला असून यवतमाळमध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस नोंदवला गेला आहे.

हेही वाचा…

कुंभमेळ्यातील 591 कोटींच्या बनावट वर्क ऑर्डरचे प्रकरण:काँग्रेसचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल; वडेट्टीवारांसह वर्षा गायकवाड यांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी 591 कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून 3 कोटींहून अधिक रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक (पुतण्या) तनय महाजन याला जामनेर येथून अटक करण्यात आली आहे. ‘दै. दिव्य मराठी’ने प्रकाशात आणलेल्या या खळबळजनक घोटाळ्यावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.