Headlines

गोऱ्हेंना विधान परिषदेची उमेदवारी नकोच!:24 वर्ष आमदार असूनही पक्ष वाढीसाठी शून्य काम, शिंदेंनी बिचकुलेंना संधी द्यावी- तृप्ती देसाई

एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये. त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी काहीही काम केलेले नाही, महिलांसाठी काही काम केले नाही. त्या ज्या भागात राहतात त्या भागात त्यांना साधा एक नगरसेवक निवडून आणता आलेला नाही, पक्ष संघटना न वाढवणाऱ्या व्यक्तीलाच संधी द्यायची असेल तर अभिजीत बिचकुले यांना संधी द्यावी, असे तृप्ती देसाई…

Read More

मन की बातचा 133वा भाग:मोदी म्हणाले- जनगणना जगातील सर्वात मोठी मोहीम, आतापर्यंत 1 कोटी 20 लाख घरांची नोंदणी झाली

पंतप्रधान मोदींनी रविवारी प्रसारित झालेल्या ‘मन की बात’ च्या 133 व्या भागात जनगणनेचा उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितले की, आपल्या देशात सध्या एक अत्यंत महत्त्वाचे अभियान सुरू आहे, ज्याबद्दल प्रत्येक भारतीयाला माहिती असणे आवश्यक आहे. हे आहे जनगणनेचे अभियान, ही जगातील सर्वात मोठी जनगणना आहे. जे साथीदार यापूर्वी अशा प्रक्रियेतून गेले आहेत, त्यांचा यावेळचा जनगणनेचा अनुभव…

Read More

राज्यातील आरोग्य समित्यांचे होणार पुनरुज्जीवन:सर्वसामान्यांना मिळणार दर्जेदार आरोग्य सेवा!

राज्यातील आरोग्य सेवेच्या गुणवत्तेवर देखरेख करण्यासाठी व नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत असलेल्या, रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समिती, महिला आरोग्य समिती, ग्राम आरोग्य पोषण व स्वच्छता समिती या समित्यांची जबाबदारी महत्वाची आहे. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगली व परिणामकारक आरोग्य सेवा देण्यासाठी या सर्व समित्यांचे पुनरुज्जीवन होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी…

Read More

कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने गुपचूप लग्न केले:पतीचे नाव-चेहरा लपवला, रणवीर सिंगसह अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन केले

यश राज फिल्म्सची कास्टिंग डायरेक्टर शानू शर्माने शनिवारी एका खासगी समारंभात लग्न केले. तिने शनिवारी सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले, पण पतीचा चेहरा आणि नाव सार्वजनिक केले नाही. पोस्ट समोर येताच रणवीर सिंगसह अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या. शानू शर्माने इंस्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले, ‘देवाच्या कृपेने मला या पृथ्वीवर सोबत चालण्यासाठी सर्वात…

Read More

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठीच सरकार सत्तेत का?:सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच भोंदूंची मस्ती वाढली- विजय वडेट्टीवार

राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देण्यासाठी सत्तेत बसले आहेत काय? असा संतप्त सवाल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज कोणापुढे झुकले असते तर स्वराज्य निर्माण झाले नसते. सत्तेत बसलेले लोक या बाबांच्या पायाशी लोळण घेतात, म्हणूनच या भोंदूंची मस्ती वाढली आहे, आणि ते महाराजांचा अपमान करतात, असे…

Read More

उबाठाच्या बैठकीला नेत्यांची दांडी, लवकरच मोठी फूट पडणार:महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोललीच पाहिजे- संजय शिरसाट

उबाठाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण गैरहजर राहतात कारण त्यांचे मन तिथे रमत नाही. यामागे निश्चित काहीतरी घडामोडी असतील नाही तर उबाठामध्ये जे जात आहे त्यांना जाऊ द्या असे म्हटले नसते, म्हणून असा अंदाज लावायला काही हरकत नाही की उबाठामध्ये लवकरच फुट पडेल असे दिसतंय, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. परंतु पक्षातंर्गत संघर्षाला कोण…

Read More

माढ्यात विवाहितेचा विजेच्या धक्क्याने संशयास्पद मृत्यू:शिक्षक पतीवर गुन्हा दाखल; माहेरच्यांकडून घातपाताचा संशय

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील विवाहित महिलेचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मात्र, विवाहितेच्या या मृत्यूवर महिलेच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून हा घातपात असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी माढा पोलिसांत मृत विवाहितेच्या शिक्षक असलेल्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचे पुढील…

Read More

लोकप्रतिनिधी कसा नसावा? हे गायकवाड यांनी दाखवून दिले:शिवाजी कोण होता? या पुस्तकावरून सत्यजित तांबे यांनी साधला निशाणा

सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता? या वादाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कसा नसावा यावरही चर्चा सुरू करून दिली, असा सनसनीत टोला आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधताना हाणला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शिर्षकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करून…

Read More

हिंगोली पोलिसांचा मोठा निर्णय:सर्वाधिक अपघात होणाऱ्या 'प्राइम टाइम'मध्ये जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर होणार नाकाबंदी!

हिंगोली जिल्ह्यात मागील चार वर्षात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चार वर्षात 679 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बहुतांश अपघात हेल्मेट नसल्याने झाले आहेत. या शिवाय सायंकाळच्या वेळेतच बहुतांश अपघात झाल्याने आता सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत नाकाबंदी केली जाणार आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहने हळू चालवली जावीत यासाठी बॅरीकेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला…

Read More

पुण्यात भीषण अपघात:डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर धडक, नायब तहसीलदारांचा जागीच मृत्यू

पुण्यातील जुन्नर तालुक्यात प्रशासकीय वर्तुळाला हादरवून टाकणारी एक भीषण अपघाताची घटना घडली असून, यामध्ये जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी (52 वर्षे) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बनकरफाटा–जुन्नर मार्गावर गणपती फाट्याजवळील ‘एस कॉर्नर’ परिसरात एका हायवा डंपर आणि होंडा सिटी कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात झाला. कर्तव्यावर असलेल्या एका जबाबदार अधिकाऱ्याचा…

Read More