Headlines

उबाठाच्या बैठकीला नेत्यांची दांडी, लवकरच मोठी फूट पडणार:महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोललीच पाहिजे- संजय शिरसाट




उबाठाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण गैरहजर राहतात कारण त्यांचे मन तिथे रमत नाही. यामागे निश्चित काहीतरी घडामोडी असतील नाही तर उबाठामध्ये जे जात आहे त्यांना जाऊ द्या असे म्हटले नसते, म्हणून असा अंदाज लावायला काही हरकत नाही की उबाठामध्ये लवकरच फुट पडेल असे दिसतंय, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. परंतु पक्षातंर्गत संघर्षाला कोण कारणीभूत आहे हे देखील उबाठाच्या नेत्यांनी पाहिले पाहिजे. संजय शिरसाट म्हणाले की, मराठीचा वाद कशाला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात राहतात ना तर मराठी बोललेच पाहिजे. कर्नाटकमध्ये गेले तर कर्नाटकची भाषा बंगालमध्ये गेले तर तिथली भाषा शिकता ना? परंतु महाराष्ट्रात वाद का घातला? इथे जर व्यवसाय करत असाल तर मराठी बोलले पाहिजे, मराठी सक्तीची असलीच पाहिजे. त्यांना वेळ हवा असेल तर तो देखील दिला पाहिजे. ठाकरे-फडणवीस भेटीचे काही कारण नाही संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी रात्री वर्षावर जात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी जी काय बातमी येत आहे, ही बातमी खोटी आहे. रात्री भेटण्याचे काहीच कारण नाही त्यांना भेटायचे असते तर ते कधीही भेटले असते. संजय गायकवाड यांचे प्रकरण वाढवणे योग्य नाही. त्यांनी त्या प्रकरणामध्ये माफी देखील मागितली आहे. सदावर्तेंना किंमत देत नाही संजय शिरसाट म्हणाले की, गुणरत्न सदावर्ते यांच्या मताला आम्हरी किंमत देत नाही. प्रताप सरनाईक यांनी जी भूमिका घेतली आहे ती महाराष्ट्राच्या हिताची घेतली आहे. म्हणून राज ठाकरे किंवा इतर पक्षाचे नेते काय बोलत आहे, याचा काहीही संबंध नाही. सदावर्ते यांनी मुद्दा भरकटवण्याचे काम बंद करावे. हे काही कोणाला स्पेस देण्याचे काम नाही. गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे संजय शिरसाट म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमधील पुंडलिकनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी असे मी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली आहे. मराठवाड्यात अवकाळी आणि गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांकडून वसुली करण्यात आलेली नाही, त्यांना मदत करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *