Headlines

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार?:खासदार संजय जाधव पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाण; 'मातोश्री'वरील बैठकीला अनुपस्थित

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून, विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर आणि महाविकास आघाडीच्या दारूण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटातील गळतीचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. निवडणुकीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली असतानाच, आता पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एक बडा नेता पक्ष सोडणार असल्याची चर्चा…

Read More

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण:रुग्णालयातून व्हिडिओ शेअर करत दिली प्रकृतीची माहिती

देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच बॉलिवूडमधूनही एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानू याला कोविड-19 ची लागण झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्वतः जानने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली. रुग्णालयातून व्हिडिओ शेअर; सकारात्मक राहण्याचा प्रयत्न…

Read More

Gold Prices Dip Rs 558 to Rs 1.50 Lakh10g; Silver Down Rs 744

नवी दिल्लीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 17 जून रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 744 रुपयांनी घसरून 2.48 लाख रुपयांवर आली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2.49 लाख रुपये प्रति किलो होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 558 रुपयांनी घसरून 1.50 लाख रुपयांवर आले…

Read More

पुणे पोलिस आयुक्तालयात महिला अधिकाऱ्याला 28 लाखांची लाच घेताना अटक:'व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज' प्रकरणातील कारवाईत एसीबीची कारवाई

पुणे शहर पोलिस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेतील सहायक पोलिस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. पुणे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर एका खासगी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण पुण्यातील कर्वे रस्त्यावरील ‘व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड’ या कंपनीशी संबंधित आहे….

Read More

या आठवड्यात सोने-चांदीमध्ये घसरण:चांदीची किंमत ₹14326 ने कमी होऊन ₹2.43 लाख प्रति किलो झाली, सोने ₹6438 ने स्वस्त झाले

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण झाली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 6,438 रुपयांनी घसरून 1.48 लाख रुपये झाला आहे. यापूर्वी तो गेल्या आठवड्यात म्हणजेच 6 जून रोजी 1.54 लाख रुपयांवर होता. तर, चांदी 2.57 लाख रुपये प्रति किलोवरून घसरून 2.43 लाख रुपयांवर आली आहे. म्हणजेच, तिची किंमत…

Read More

जिवंत क्षेपणास्त्रासह भारतात पोहोचले तेल टँकर:ओमान किनाऱ्याजवळ हल्ला झाला; 2000 किमी प्रवास करून कोचीत आले, नौदलाने क्षेपणास्त्र हटवले

भारतीय नौदलाने संयुक्त अरब अमिरातीच्या फुजैराह येथून कोचीला आलेल्या एका तेलवाहू जहाजातून (ऑइल टँकर) जिवंत क्षेपणास्त्र सुरक्षितपणे काढून मोठे सागरी संकट टाळले आहे. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 26 मे रोजी ओमानच्या किनाऱ्याजवळ एमटी ऑलिम्पिक ऑइल टँकरवर हल्ला झाला होता. या जहाजावर मार्शल बेटांचा ध्वज होता. हल्ल्यानंतर क्षेपणास्त्राचे वॉरहेड फुटले नाही, तर ते टँकरच्या बाहेरील भागातून…

Read More

दगडूशेठ ट्रस्टतर्फे 400 ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र:श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने कान तपासणी करून केले वाटप

पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या शिबिरासाठी राज्यातील विविध शहरांतून आणि ग्रामीण भागातून ज्येष्ठ नागरिक पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक…

Read More

महालक्ष्मी सरस:अहिल्यानगरच्या मंगला वाकचौरे यांची कमाल; मडक्यातील लोणचे 4 दिवसांत 40 Kg विकले, किलोमागे 1 हजाराचा भाव

उमेद अभियानाच्या माध्यमातून आयोजित महालक्ष्मी सरस 2026 मध्ये राज्यभरातून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसाय, हस्तकला आणि खाद्यपदार्थांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मेळ्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गावच्या मंगला संजीव वाकचौरे (वय 40 वर्षे) यांनी मडक्यातील पारंपरिक लोणच्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 2 मेपासून सुरू झालेल्या या मेळ्यात अवघ्या चार दिवसांत…

Read More

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा निर्धार; विद्यार्थ्यांनी घेतली सामूहिक शपथ:मानूर येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निसर्ग संवर्धनाचा संकल्प‎

पर्यावरण संतुलन राखणे आणि निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे ही काळाची गरज ओळखून शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या निसर्ग संवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा प्रभावी संदेश दिला. पंधरवड्यानंतर पावसाने हजेरी लावल्याचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली. यावेळी संस्थापक वनश्री डॉ. जे. डी. पवार आणि प्राचार्य बी. एन….

Read More

रूपाली ठोंबरे विधान परिषदेसाठी इच्छुक:सक्षम, अभ्यासू व लढाऊ महिला प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे मागणी

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे…

Read More