![]()
मराठी राजभाषा समृद्ध आहे. अनेक मुस्लिम साहित्यिकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली असून साहित्यातील कादंबरी, कथा याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कवितेच्या विविध प्रकारचे लिखाण आहेत, ती प्रकाशात यावीत अशी अपेक्षा प्रा. दस्तगीर जमादार यांनी केली . अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित “पुस्तकावर बोलू या ” या उपक्रमाअंतर्गत मत व्यक्त केले . सोशल महाविद्यालयात रविवारी “पुस्तकावर बोलू’ या कार्यक्रमाची सुरुवात कुरण पठणाने झाली. प्रस्तावना सचिव अय्यूब अहमद नत्लामंदू यांनी केले. हसीब नदाफ , मुबारक शेख , इक्बाल बागबान , मजहर अत्लोळी यांनी पाहुण्यांचा सन्मान केला. यानंतर अनिसा शेख दौंड लिखित ” काव्य सप्तक ” हा काव्य संग्रह प्रकाशन करण्यात आले . प्रा. जमादार यांनी डॉ. शकील शेख, डॉ. इ. जा. तांबोळी यांनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून व कवी मुबारक शेख यांनी कवितेच्या माध्यमातून साहित्य सेवा केली असून ती गौरवशाली आहे. डॉ . शकील शेख यांची “ज़ुबा ” वर डॉ. सुरैय्या परवीन जहागीरदार विचार मांडले, “जुबा’ उपेक्षितांच्या आवाजाचे प्रतिनिधीत्व करणारी व इतिहासातील कटुसत्य उघड करणारी सामाजिक दस्तऐवज आहे. प्रा. महमद शेख यांनी सूत्रसंचालन केले . माझे माझे म्हणशील रे इथेच जायचे सोडून … ही कविता मुळेगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका हाफीजा बागवान यांनी सादर केली. पुण्यातील लोहगड किल्ल्यावरील “सिया” हिने प्रियकराच्या मदतीने होणा-या पतीला दरीत ढकलून दिले यावरही अब्दुल हमीद सय्यद यांनी कविता, चारोळी सादर केली. दुपारच्या सत्रात झालेल्या कविसंमेलनात ४० कवींनी कविता, चारोळी सादर केले. अतिसा शेख अध्यक्षस्थानी होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयावरील कविता गझल सादर करून सर्वांची दाद मिळविली, कवी ॲड. हाषम पटेल , हमीद शेख, कमलाकर सावंत, सिकंदर मुजावर, फारूक काझी, नूरजहां कोरबू यांनी कविता सादर केल्या. सूत्रसंचालन तहसीन सय्यद (लातूर) यांनी केले तर आभार जाफर बांगी यांनी मानले. उत्तरेश्वर जानराव यांनी “संस्कृती”, गौसपाक मुलाणी यांनी मी उद्याची नवीन वाट शोधतो, अब्दुल हमीद सय्यद यांनी आडवू नका मला हो… अशा एकापेक्षा एक सुंदर कवीता कवींनी सादर केल्या. “श्यामचा बाप’ या कादंबरीवर भाष्य करताना कवी खाजाभाई बशीर बागबान म्हणाले, व्यसनाधीनतेमुळे उध्वस्त होणारे तरूणाचे जीवन, आईचे अथक परिश्रम, शिक्षणासाठी संघर्ष करणारा तरुण जाती धर्माचा भेद भावामुळे होणारी उपेक्षा आणि मातृत्वाच्या त्यागातून उभे राहणारे जीवन, हे सर्व घटक वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतात. ही कादंबरी समाजातील दुर्लक्षित घटकांना आवाज देत ती वाचकाला अनेक प्रश्न विचारते. परंतु समाजाकडून अपेक्षित असलेले उत्तर सापडत नाही याची खंत वाटते . कवी मुबारक शेख यांचा काव्यसंग्रह “अजान आणि चालिसा ” या वर प्रा. बी. एच . करजगीकर म्हणाले, अजान अणि चालिसा ही सोप्या सरळ भाषेतील काव्यसंग्रह असली तरी त्यात मांडलेले विषय मात्र गंभीर दिसतात. समाजातील गरीबी, दारिद्री, शिक्षणाचा अभाव तसेच झोपडीत राहून सुद्धा महालाच्या स्वप्नापर्यंत मजल मारणारी माणसाची सत्यता दर्शविते.
Source link
मराठी राजभाषा समृध्द करण्यासाठी मुस्लिम साहित्यिकांचे मोठे योगदान:मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचा उपक्रम चर्चासत्र, कवी संमेलनाचे आयोजन