Headlines

दगडूशेठ ट्रस्टतर्फे 400 ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र:श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने कान तपासणी करून केले वाटप




पुणे येथे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्रातील ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या शिबिरासाठी राज्यातील विविध शहरांतून आणि ग्रामीण भागातून ज्येष्ठ नागरिक पुण्यात आले होते. या कार्यक्रमाला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, तसेच सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण उपस्थित होते. ट्रस्टचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्तेही यावेळी हजर होते. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी यावेळी बोलताना सांगितले की, दगडूशेठ गणपती ट्रस्ट आणि विविध संस्था व कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने अशा शिबिरांचे आयोजन केले जाते. केवळ पुणेच नव्हे, तर इतर शहरांमधूनही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातून समाजातील गरजूंची मोठी संख्या समोर येत असल्याचे त्यांनी नमूद केले. आजच्या कार्यक्रमात ४०० रुग्णांना श्रवणयंत्रे प्रदान करण्यात आली. रासने यांनी पुढे सांगितले की, कानाच्या विकारांव्यतिरिक्त ट्रस्ट विविध आजार, कृत्रिम अवयव आणि इतर सर्व प्रकारची वैद्यकीय मदत सातत्याने पुरवत आहे. ‘जय गणेश रुग्णसेवा अभियाना’च्या माध्यमातून लाखो गरजू रुग्णांना लाभ मिळत असून, समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. मिरवणुकी द्वारे आझम कॅम्पसचे महामानवाला अभिवादन महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस)च्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आझम कँपस येथून ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आबेदा इनामदार यांच्या हस्ते या मिरवणुकीला प्रारंभ झाला.महात्मा गांधी रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव प्रा .इरफान शेख ,डॉ.एन.वाय , काझी ,इफ्तेकार इनामदार ,अफजल खान, मशकुर शेख, अब्दुल वहाब शेख,महंमद गौस सय्यद,आरिफ सय्यद,धनंजय पाळणे ,प्रवेश कुमार , शब्बीर शेख , इरफान खान ,मुश्ताक पटेल,विश्वस्त, मुख्याध्यापक , प्राचार्य ,पदाधिकारी, कर्मचारी ,विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच अवामी महाज सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले.अल्पसंख्य समुदायातील विद्यार्थिनींचे प्रमाण लक्षणीय होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *