संभाजीनगरच्या पुंडलिकनगरात पोलिसाचा शिवसेना पदाधिकाऱ्यावर चाकूहल्ला:3 जखमी, कुटुंबीयांनाही मारले, रात्री उशिरापर्यंत शिवसैनिकांचा ठिय्या
पुंडलिकनगर भागात पोलिस कर्मचाऱ्याने शुक्रवारी (२४ एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास सत्ताधारी शिवसेनेचे उपविभाग प्रमुख विकास नरवडे व त्यांच्या कुटुंबावर चाकू हल्ला केला. हल्ल्यात नरवडे यांच्या गालापासून ते मानेपर्यंत चाकूचे वार आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू होते. यानंतर रात्री जमाव रस्त्यावर जमला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी व जखमी असलेले…