लासूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची चोरट्यांवर नजर:बाजार समिती परिसरात कॅमेऱ्यांमुळे चोऱ्या, गुन्हेगारीला आळा बसणार
मराठवाड्यातील नंबर दोनची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत व्यापार पेठेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर आहे. त्यामुळे येथील चोऱ्या, गुन्हेगारीचे चित्रीकरण फुटेज थेट पोलिसांच्या तपासकामासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. बाजार समितीचे सभापती शेषराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळाच्या वतीने बाजार समिती प्रशासनाकडून संपूर्ण अडत व्यापार पेठेत चहुबाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे…