![]()
मराठी भाषा बोलता-लिहिता येणार नाही अशा रिक्षाचालकांवर १ मेपासून दंडात्मक तसेच परवाना निलंबन व रद्दची कारवाई केली जाईल, असा निर्णय शिंदेसेनेचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दहा दिवसांपूर्वी घेतला. त्याला शिंदेसेनेचेच नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी विरोध केला. त्यांनी मुंबईतील हिंदी भाषिक तसेच रिक्षाचालकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला. दुसरीकडे १५ लाख रिक्षाचालकांनी ४ मेपासून संपावर जाण्याचा इशारा दिला. यातील मराठी मतांचे गणित लक्षात घेऊन मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, ‘भय्यांना’ मुंबईबाहेर काढण्याची हीच वेळ आहे. एवढेच नव्हे तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी दहिसर येथे निरुपम यांच्या गाडीवर दगडफेकही केली. राजकीय विश्लेषकांच्या मते मराठी सक्ती हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा आहेच. पण त्यातही भाजप, शिंदेसेनेला रिक्षावाल्यांत आपली व्होट बँकही दिसते.
Source link
संजय निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक:रिक्षाचालकांना मराठी सक्तीवरून शिंदेसेना, मनसेतील वाद वाढला